एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत शिबानी गुप्तेचा मानांकीत खेळाडूवर विजय

पाचगणी, दि.22 नोव्हेंबर 2022 : रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् कर्नाटकच्या  टेनिस स्पर्धेत दुस-या फेरीत मुलींच्या गटात बिगर मानांकीत शिबानी गुप्तेने मानांकीत खेळाडूवर मात करत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
 
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुस-या फेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या शिबानी गुप्ते आपल्या राज्य सहकारी सहाव्या मानांकीत दुर्गा बिराजदारचा 6-2, 6-3 असा पराभव करत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. तमिळनाडूच्या अव्वल मानांकीत माया राजेश्वरन हीने अदिती महाराष्ट्राच्या गायकवाडचा 6-1, 6-0 असा तर महाराष्ट्राच्या दुस-या मानांकीत नैनिका बेंद्रमने ईश्वरी कारेकरचा 6-1, 6-1 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 16वर्षाखालील मुली:
माया राजेश्वरन(तमिळनाडू)(1) वि.वि अदिती गायकवाड( महाराष्ट्र  ) 6-1, 6-0
नैनिका बेंद्रम( महाराष्ट्र  )(2)  वि.वि   ईश्वरी कारेकर( महाराष्ट्र  )6-1, 6-1
शैवी दलाल(गुजरात)(3) वि.वि भक्ती ताजने( महाराष्ट्र  ) 6-1, 6-2
देवांशी प्रभुदेसाई( महाराष्ट्र  )(4)  वि.वि   रितिका दावलकर( महाराष्ट्र  ) 6-2, 6-4
आराध्या वर्मा(ओरिसा)(5)  वि.वि   ऐंजल पटेल(गुजरात) 6-0, 3-6, 7-6(5)
शिबानी गुप्ते( महाराष्ट्र)  वि.वि   दुर्गा बिराजदार( महाराष्ट्र)(6) 6-2, 6-3
मेघना जीडी(कर्नाटक)(7)  वि.वि   संचिता नगरकर( महाराष्ट्र  )6-4, 6-2
रिद्धी शिंदे( महाराष्ट्र  )(8)  वि.वि   काव्या पाटणी(मध्य प्रदेश) 6-0, 6-1
सानवी मिश्रा(कर्नाटक)(9)  वि.वि   साईशा कारेकर( महाराष्ट्र  ) 7-6(2), 6-1
सेरेना रॉड्रिक्स ( महाराष्ट्र)   वि.वि  सहाना कमलकन्नन (तमिळनाडी) 5-7, 6-3, 6-1
रजिथा राजेश ( महाराष्ट्र  )  वि.वि   सन्मिथा एल (तमिळनाडू) 6-3, 6-1
श्रावणी देशमुख (महाराष्ट्र)  वि.वि   हृतिका कापले ( महाराष्ट्र  ) 7-5, 6-3