मुंबई : राज्यात १ जूनपासून मिळणार लॉकडाऊन निर्बंधांमधून दिलासा; ‘या’ सवलती मिळण्याची शक्यता

मुंबई, २५ मे २०२१: राज्यातील घटती रूग्णसंख्या लक्षात घेत, लॉकडाऊन हळूहळू हटविण्याबाबत सरकार चर्चा करीत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आठवड्याच्या शेवटी त्यावर निर्णय घेतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. येत्या एक जूनपासून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने खुली करण्यास परवानगी मिळू शकते असा अंदाज वर्तविला जात आहे.

महाराष्ट्रातील करोना रूग्णसंख्येत सातत्याने घट दिसून येत आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण असलेल्या जिल्ह्यात रूग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत नसलेली इतर दुकाने खुली करण्यास परवानगी मिळू शकते. याव्यतिरिक्त, औद्योगिक क्षेत्रांत देखील सूट दिली जाऊ शकते तथापि, आणखी काही आठवडे रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी खुले होण्याची शक्यता नाही. सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची संख्या सध्याच्या स्थितीपेक्षा १५% वाढविली जाऊ शकते. तथापि, रेस्टॉरंट्स, मॉल्स, मल्टिप्लेक्स बंद राहतील कारण ते प्रथम स्थानावर सुपरप्रेडर असल्याचे सिद्ध झाले असल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २२ हजार नवीन रुग्ण आढळून आले असून ४२,३२० लोक बरे झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही तीव्र घट झाली आहे. २४ तासात ३६१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३,२७,५८० वर आली आहे, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही ८९,२१२ वर पोहोचली