महापालिकेतर्फे लसीकरण मोहिमेचे नियोजन जाहीर; महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती

पुणे, 9 मे 2021: महापालिकेतर्फे 10 मे रोजी होणाऱ्या लसीकरण मोहिमेबाबातचे नियोजन जाहीर करण्यात आले असून, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.

या नियोजनानुसार, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी सोमवारी (दि.10) ६ केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यात २ केंद्रांवर कोविशील्ड तर ४ केंद्रांवर कोवॅक्सिन उपलब्ध असेल. अपॉइंटमेंट/स्लॉट बुकींगची सुविधा रात्री ८ वाजता सुरू होईल. केवळ बुकींग असणाऱ्या नागरिकांनाच लस दिली जाईल. तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी उद्या १११ केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यात १०१ केंद्रांवर कोविशील्ड तर १० केंद्रांवर कोवॅक्सिन उपलब्ध असेल. कोवॅक्सिन उपलब्ध असणाऱ्या १० केंद्रांवर १२ एप्रिल २०२१ पूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनाच दुसरा डोस दिला जाईल. तर कोविशील्ड उपलब्ध असणाऱ्या केंद्रांवर २२ मार्च २०२१ पूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य असेल. तसेच अपॉइंटमेंटनुसार येणाऱ्या २० टक्के नागरिकांना पहिला डोस दिला जाणार आहे.