जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर यांना राष्ट्रीय पुरस्कार

पुणे, ०९/०३/२०२२: संपूर्ण भारतातून एक दुर्मिळ वाद्यवादक  म्हणून दिला जाणारा  बाबा अल्लाउद्दीन खान अकादमी भोपाळ, मध्य प्रदेश सरकारच्या वतीने   पद्मश्री उस्ताद अब्दुल लतीफ खान स्मृती  पुरस्कार (२०२१-२२) पुण्यातील  सुप्रसिध्द जलतरंग वादक श्री मिलिंद तुळाणकर यांना देण्यात आला. हा पुस्कार  शहीद भवन, भोपाळ  येथे  झालेल्या कार्यक्रमात संचालक, सांस्कृतिक मंत्रालय ,  मध्यप्रदेश  आदित्यकुमार  त्रिपाठी यांच्या हस्ते   कला अकादमीचे  अध्यक्ष  मा. जयंत भिसे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

 

मिलिंद तुळाणकर  गेली ३५ वर्षे जलतरंग वाजवत असून त्यांनी आत्तापर्यत इंग्रजी ,तामिळ, मराठी अशा विविध भाषांमधिल चित्रपटांच्या संगीतात  व टायटन, ब्रिटानिया  इत्यादिच्या जाहिराती मधे योगदान दिले असून   भारतात  सर्वत्र व परदेशात  २० पेक्षा जास्त देशात  जलतरंग  या  वाद्याच्या  प्रसारासाठी  कार्यक्रम केले आहेत. त्यांना पूर्वी ही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांच्या  या  कार्याचा गौरव  म्हणून रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन हा पुरस्कार देण्यात  आला.

 

जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर यांना  पद्मश्री उस्ताद अब्दुल लतीफ खान स्मृती  पुरस्कार (२०२१-२२)देतांना (डाविकडून)कला अकादमीचे  अध्यक्ष जयंत  भिसे .जलतरंग वादक श्री मिलिंद तुळाणकर  आणि संचालक, सांस्कृतिक मंत्रालय , मध्यप्रदेशचे  आदित्यकुमार  त्रिपाठी