नॅशनल हॉर्स रायडर तरूणीने केली आत्महत्या, नांदेड सिटीतील ११ मजल्यावरून मारली उडी

पुणे, दि. १/०८/२०२१: राष्ट्रीय घोडेस्वार असलेल्या तरूणीने इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड सिटीतील मधुवंती इमारतीत घडली. श्रीया गुणेश पुरंदरे (वय १७, रा. डी- मधुवंती, नांदेड सिटी) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही

रविवारी सकाळी नउच्या सुमारास श्रीयाने नांदेड सिटीतील मधुवंती इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून खाली उडली मारून आत्महत्या केली. त्याचवेळी गॅलरीत व्यायाम करणारे अभिजीत देशमुख यांना काहीतरी जोरात खाली पडल्याचा आवाज आला. त्यांनी खाली पाहिले असता मुलीच्या वर्गात शिकणारी श्रीया पडल्याचे दिसून आले. त्यांनी घटनेची माहिती हवेली पोलिस ठाण्याला दिली. त्यानंतर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी श्रीयाचा मृतदेह आढळून आला. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलिसांकडून आत्महत्येचा तपास केला जात आहे.

चौकट- वडिलांची हॉर्स रायडिंग अ‍ॅवॅâडमी
श्रीया हिच्या वडीलांची हॉर्स राडींगची अ‍ॅकॅडमी आहे. बालपणीपासून श्रीया हॉर्स रायडींगचे धडे घेत होती. राज्य व राष्ट्रीय पातळीवर तिने अनेक पारितोषिके पटकावली आहेत. तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.