पुणे, ६ जानेवारी २०२२: छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच होते आणि त्यांनी धर्मासाठी बलिदान केले. परंतु मतांसाठी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारी राष्ट्रवादी काँग्रेस इतिहास बदलू पाहत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तातडीने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते असे वक्तव्य विधिमंडळात केले होते त्यानंतर पवार यांच्या विरोधात भाजप व हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात आज भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
मुळीक म्हणाले, ‘सर्व सामान्य जनतेच्या मनात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ज्या भावना आहेत आणि इतिहासामध्ये त्यांच्या जाज्वल्य धर्म प्रेमामुळे त्यांची जी प्रतिमा अधोरेखित झाली आहे त्याच प्रतिमेचा पुनरुच्चार करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय” असा नामोल्लेख असलेल्या स्टीकरचे आज प्रकाशन करून वितरण करण्यात आले. अनेक वाहन चालकांनी अत्यंत स्वखुशीने स्वतःच्या वाहनावर हे स्टीकर अभिमानाने लावले. हे स्टीकर संपूर्ण शहरात भाजपा तर्फे वाटण्यात येणार आहेत. सर्व नागरिकांनी हे स्टीकर आपल्या घराच्या दारावर, वाहनांवर, कार्यालयात लावावेत असे आवाहन श्री मुळीक यांनी केले.
मुळीक पुढे म्हणाले, पवार यांनी केलेले वक्तव्य मागे घेतेले पाहिजे आणि महाराष्ट्रातील शिव प्रेमी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे यावर भाजप ठाम आहे.
यावेळी सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपूरे, दिपक नागपुरे, संदिप लोणकर, यांच्यासह माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
More Stories
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू
22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत तात्जाना मारिया व निगिना अब्दुरैमोवा यांच्यात अंतिम लढत