एसएफए अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या दिवशी लांब उडीमध्ये सिम्बायोसिस स्कुलच्या नील आपटे, पीआयसीटी मॉडेल स्कुलच्या आर्या वाघ यांना सुवर्णपदक

पुणे, 12 डिसेंबर 2022: स्पोर्ट्स फॉर ऑल(एसएफए) अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या दिवशी लांब उडी प्रकारात मुलांच्या गटात सिम्बायोसिस स्कुलच्या नील आपटे याने , मुलींच्या गटात पीआयसीटी मॉडेल स्कुलच्या आर्या वाघ यांनी अव्वल क्रमांक पटकावत सुवर्णपदकाची कमाई केली.  
 
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात सिम्बायोसिस स्कुलच्या नील आपटेने 4.19मीटर उडी मारत सुवर्णपदक पटकावले. तर विद्या प्रतिष्ठानच्या अर्थ कांबळे(3.99मी)याने दुसरा संस्कृती स्कुलच्या अन्वेश पांडा(3.59मी) याने तिसरा क्रमांक पटकावला. 
 
मुलींच्या गटात  पीआयसीटी मॉडेल स्कुलच्या आर्या वाघ हिने 3.28 मीटर उडी मारत अव्वल क्रमांक पटकावला. एल्प्रो इंटरनॅशनलच्या दिया कोपर्डे(2.82मी)ने रजत पदक मिळवले.   
 
याशिवाय, ऍथलिटस शर्यतीत मुलांच्या गटात होली स्पिरिट कॉन्व्हेंट स्कुलच्या साई घोडे याने 9.17 सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. एज्युकॉन इंटरनॅशनल स्कुलच्या अभ्युदय सिंग(9.271से)आणि केंद्रीय विद्यालयच्या रियान चव्हाण(9.298से)यांनी अनुक्रमे रजत व कांस्य पदक पटकविले.  
 
सर्वांसाठी क्रीडाक्षेत्र खुले असावे, अशा हेतूने व क्रीडाक्षेत्राचा तळागाळापासून प्रचार व प्रसार करण्यासाठी स्पोर्टस फॉर ऑल या भारतातील पहिल्या डिजिटल व मैदानावर काम करणाऱ्या संस्थेतर्फे पुण्यात येत्या ११ ते १७ डिसेंबर २०२२ दरम्यान स्पोर्ट्स फॉर ऑल क्रीडास्पर्धेच्या पहिल्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

अशा प्रकारच्या या पहिल्याच क्रीडास्पर्धेत पुण्यातील ५०० हून अधिक शाळांमधून ८२००चा सहभाग नोंदवला असून एकूण ३ लाख रुपये पारितोषिक रक्कम ठेवण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांबरोबरच प्रशिक्षकांसाठीही आखण्यात आलेल्या खास योजनेनुसार एकूण १२ लाख रुपयांच्या शिष्यवृत्त्या देण्यात येणार आहेत.


बुद्धिबळ क्रीडा प्रकारात 7वर्षाखालील सेंट जोसेफ हायस्कुलच्या नभा पुजारीने, तर 13वर्षाखालील मुलींच्या गटात द ऑर्चिड स्कुलच्या ऋतू जमादार   हिने आणि 15 वर्षाखालील गटात विद्या व्हॅली स्कुलच्या काव्या अरुण यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले.