पुणे, 12/12/2021: सावित्रीबाल फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्यामुळे पुण्यातील या विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क पार्कमध्ये महिला उद्योजकांनी त्यांचे कार्य दाखवणे अत्यंत समर्पक आहे ,असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. पीयूष गोयल यांनी आज पुणे विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्कला भेट दिली.
महाराष्ट्रात स्टार्ट-अप संस्कृतीचे नेतृत्व महिलांनी करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत “आपण उद्योजकीय चौकट जिवंत ठेवली पाहिजे,” असे ते म्हणाले. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामध्ये स्टार्ट-अपमध्ये कार्यक्षेत्राचा भाग म्हणून नोंदणीकृत 46 टक्के एककांमध्ये महिला भागीदार आहेत त्याचप्रमाणे श्रेणी 2 आणि श्रेणी 3 शहरांचा स्टार्टअप्समध्ये 45 टक्के वाटा आहे, ही बाब उत्साहवर्धक आहे .” असे त्यांनी सांगितले.
इनक्यूबेटरची तुलना पालकांशी करताना मंत्री म्हणाले की, हे दोघेही मार्गदर्शक आणि समर्थक असून त्यांची स्टार्ट-अप्सना गरज आहे.“आज आपल्याकडे संपूर्ण भारतभर स्टार्टअप कार्यक्षेत्र आहे. भारतात 50000 पेक्षा जास्त स्टार्ट अप्स नोंदणीकृत असून हे जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्ट अप कार्यक्षेत्र आहे”, असे ते म्हणाले.
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामध्ये केलेल्या नोंदणीनुसार पुण्यात 3200 तर मुंबईत 3274 स्टार्ट-अप्स आहेत, अशी माहिती देत मंत्र्यांनी पुणे-मुंबईमधील ही निकोप स्पर्धा सुरू ठेवावी, अशी सूचना केली.
पुण्यात असलेले उद्योग, माहिती आणि तंत्रज्ञान तसेच उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांमुळे स्टार्ट-अपला पाठबळ देण्यात पुण्याच्या अनोख्या योगदानाचे वर्णन करत गोयल म्हणाले की, स्टार्ट-अप कार्यक्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याची वेळ आली आहे.
स्टार्ट-अप्सच्या भरभराटीसाठी, अकादमी, उद्योग आणि संशोधन यांच्या सहकार्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भारतातील 79 युनिकॉर्नपैकी 4 पुण्यातील आहेत ही आनंददायी बाब आहे, असे ते म्हणाले. पुणे विद्यापीठातील विज्ञान तंत्रज्ञान पार्कमध्ये 153 स्टार्ट अप्स आहेत.
आज विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्कमध्ये दिव्यांग लोकांसाठी दाखवण्यात आलेले काही नवनवीन शोध उत्कंठावर्धक होते हे लक्षात घेऊन,शेतकरी, दिव्यांग आणि गरीबांसाठी आणखी नवनवीन संशोधन केले जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
सरकारच्या हस्तक्षेपामुळे उद्योगांची प्रगती नेहमीच खुंटते यावर भर देत मंत्र्यांनी साठ आणि सत्तरच्या दशकात सरकारी हस्तक्षेपामुळे औद्योगिक प्रगती खुंटल्याचे उदाहरण दिले. आज कोणताही युनिकॉर्न केवळ सरकारी पाठिंब्याच्या आधारे या स्थितीपर्यंत पोहोचला नसता, असे ते म्हणाले. स्टार्ट-अपची रचना उद्योजकांनी तयार केली असेल आणि सरकार केवळ सहाय्यासाठी सुविधा देण्याच्या स्वरूपात असेल तरच पुढे जाण्याचा मार्ग सुकर होईल, असे त्यांनी सांगितले.
कोवॅक्सिनसारखे काही उपक्रम हे सरकार आणि उद्योग सहकार्याचे उत्तम उदाहरण आहेत असे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणाचा समारोप करताना गोयल म्हणाले की, भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात परंतु या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीनें शेतकरी, दिव्यांग आणि गरीब यांच्यासाठी अत्यंत किफायतशीर उपायांसह अब्जावधी उद्योजकही आहेत.
पार्श्वभूमी
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि पुणे विद्यापीठ यांनी संयुक्तपणे विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजक पार्क, पुणे,स्थापन केले आहे. इतर विविध मंत्रालयांव्यतिरिक्त या पार्कला अलीकडेच स्टार्टअप इंडियाच्या बीजनिधी (सीड फंड) कार्यक्रमांतर्गत निधी देण्यात आला आहे.
स्टार्टअप इंडियाचा बीजनिधी (सीड फंड) कार्यक्रम हा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत एक प्रमुख कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम संपूर्ण भारतातील स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि अॅग्रिकल्चर, पुणे चे प्रशांत प्रशांत गिरबाने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा