पुणे, 19/7/2022: मुळशी तालुक्यातील लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे झालेल्या भूस्खलनाचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेला (जीएसआय) सर्वेक्षण करण्याबाबत कळवले आहे. दरम्यान मुळशी धरण परिसरात नोंद झालेली कंपने भूकंपाची नसून अतिशय कमी तीव्रतेची असल्याची माहिती टाटा पॉवरकडून देण्यात आली.
टाटा पॉवरने मुळशी धरण परिसरात भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाल्याबाबत प्रथमदर्शनी कळवले होते. तथापि, नोंद झालेली कंपने ही भूकंपाची नसून ४०-४२ किमी परिघामधील विस्फोट, भूस्खलन आदी स्वरुपाच्या आघातजनक घटनांमुळे झाले असल्याचा अंदाज आहे. नोंद झालेली कंपने अतिशय कमी तीव्रतेची (०.२ जी) असल्याचे दिसून आले, असे टाटा पॉवरकडून सांगण्यात आले. त्यामुळे लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे झालेल्या भूस्खलनाचे नेमके कारण शोधण्यासाठी या जागेचे सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे जीएसआयला कळवले आहे.
000
More Stories
पुणे: हिंजवडी च्या मंदिरात जन्माष्टमी, गोपाळकाला उत्सव
उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी ७५ दिवस ७५ शहरात ७५ कार्यक्रमांचे आयोजन
विश्वकर्मा विद्यापीठात स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा