December 2, 2025

संतोष देशमुख प्रमाणे कोणाचीही हत्या करण्याची हिंमत होऊ नये: रोहित पवार

पुणे, ४ जानेवारी २०२५: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकरी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले की आत्ता आरोपी कोण आहे हे कळलं आहे. आज अजून आरोपी पकडले आहेत पण अजून एक आरोपी राहिला आहे.जे कोणी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.परत अस कोणी करू नये अशी कडक कारवाई सरकारने केली पाहिजे अस यावेळी रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार हे पुण्यात आले असता त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

रोहित पवार म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काही वर्षांपूर्वी एक योजना आणली होती.त्यात सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले मग आत्ता टप्प्याटप्प्याने ७० टक्के शेतकऱ्यांचे पैसे थांबले आहे. आता निवडणूक झाली आहे.भाजप मित्र पक्षाला बहुमत मिळाले आहे त्यामुळे आत्ता हळूहळू टप्प्याटप्प्याने आमच्या लाडक्या बहिणींना वंचित ठेवण्यात येणार आहे. आम्ही विरोधात आहोत पण लाडक्या बहिणीसाठी आम्ही भांडु अस यावेळी रोहित पवार म्हणाले.

वाल्मीक कराड यांच्या सोबतचे काही फोटो आत्ता व्हायरल होत आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की धनंजय मुंडे हे आमच्या पक्षातील मोठे नेते होते आता ते अजित पवारांसोबत आहेत.माझ्या जवळचा आहे माझा निष्ठावंत आहे यांच्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही बीडमध्ये काही करायचं असेल तर त्याच्याशी संपर्क साधावा लागत असेल असं जर कोणी दाखवत असेल तर अनेकांचे फोटो असतील ना तसेच आम्ही कुठेही कार्यक्रमाला गेलो तर अनेक जण फोटो काढतात. फडणवीस साहेब पवार साहेब तसेचआमच्या सोबत कोणाचे फोटो काढण्याचे लिंकिंग करणे योग्य नाही. योग्य कलम लावून योग्य कारवाई झाली पाहिजे अस यावेळी रोहित पवार म्हणाले.

पालकमंत्री पदाबाबत पवार म्हणाले, सरकार कडून मंत्री पद दिलं गेलं आहे पण ठराविक मंत्री सोडलं तर कोणी काम करत नाहीत बरेच मंत्री नाराज आहेत निधी नसणाऱ्या खात्याचे मंत्री केल असल्याचं कळत आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री कशासाठी हवाय तर जिल्ह्यासाठी बजेट बघून पालकमंत्री व्हायचे आहे काय गडबड सुरू आहे कळत नाही. जनतेने तुम्हाला बहुमत दिला आहे राज्याला सुरळीत आणि चांगल्या दिशेनेच घेऊन जायला पाहिजे पण अस न होता पालकमंत्री पदासाठी भांडत बसले आहेत अस यावेळी रोहित पवार म्हणाले.