पुणे : आता एसी बसमधून फक्त १० रुपयात करा दिवसभर अमर्याद प्रवास 

पुणे, ०९/०७/२०२१: महानगरपालिकेकडून पुणे महानगर परिवहन महामंडळाला “दहा रुपयात दिवसभर एसी बस प्रवास” या योजनेसाठी ५० मिडी सीएनजी एसी बसचे लोकार्पण करण्यात आले.

सदरच्या ५० मिडी सीएनजी एसी बसचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते दि. ९ जुलै २०२१ रोजी आर्यन पार्किंग, महात्मा फुले मंडई येथे पार पडला.

“दहा रुपयात दिवसभर एसी बस प्रवास” या बससेवा योजनेला “अटल सेवा…शटल सेवा पुण्यदशम” असे नाव देण्यात आलेले असून या योजनेअंतर्गत दिवसभरामध्ये दहा रुपयात अहस्तांतरणीय तिकिटाद्वारे एसी (वातानुकुलित) बसमधून कितीही वेळा प्रवास करता येणार आहे. या योजनेसाठी असलेल्या फक्त गुलाबी रंगसंगतीच्या मिडी बसेसमधूनच दहा रुपयात दिवसभर प्रवास करता येणार आहे.

सदरच्या बस लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुणे मनपाचे महापौर मुरलीधर मोहोळ होते तर पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने   यांच्या संकल्पनेतून “दहा रुपयात दिवसभर एसी बस प्रवास” ही योजना साकारत आहे.

या योजनेसाठी गुलाबी रंगसंगतीच्या, २४ आसन क्षमता असलेल्या व सीएनजीवर धावणाऱ्या मिडी एसी बसेसचा वापर होणार असल्याने वाहतूक कोंडीसह वायू व ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. स्वस्त, जलद, सुरक्षित, आरामदायी प्रवास व पर्यावरण पुरकता ही या बससेवेची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

पहिल्या टप्प्यात ९ जुलैपासून ५० मिडी सीएनजी एसी बसेस पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात व पेठांमध्ये धावणार आहेत. तर डिसेंबर २०२१ मध्ये महानगरपालिकेकडून आणखी ३०० बसेस परिवहन महामंडळाला दिल्या जाणार असून त्याद्वारे संपूर्ण शहरात सहा विभागांमध्ये या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. “अटल सेवा…शटल सेवा पुण्यदशम” या योजनेअंतर्गत मिडी सीएनजी एसी बसेस खालील ९ मार्गांवर धावणार असून बसेसची संख्या व वारंवारिता खालील तक्त्यात नमूद केली आहे.

.क्र. मार्ग

क्रमांक

पासून पर्यंत बस

संख्या

वारंवारिता
पुणे स्टेशन ते शिवाजीनगर नवीन एसटी स्टॅण्ड

मार्गे – कलेक्टर कचेरी, मनपा, लोकमंगल, वाकडेवाडी

०३ ३० मि.
स्वारगेट ते शिवाजीनगर

मार्गे – शनिपार, अ.ब.चौक, मनपा, येताना मंडई

२० ०३ मि.
स्वारगेट ते पुणे स्टेशन

मार्गे – एस पी कॉलेज, केसरीवाडा, अ.ब.चौक, फडके हौद

०२ ४० मि.
स्वारगेट ते शिवाजीनगर

मार्गे – एस पी कॉलेज, डेक्कन, फर्ग्युसन रोड येताना जंगली महाराज रोड

०४ १५ मि.
स्वारगेट ते पुणे स्टेशन

मार्गे – नाना पेठ, पॉवर हाऊस, के ई एम हॉस्पीटल

१० ०५ मि.
स्वारगेट ते पुणे स्टेशन

मार्गे – नाना पेठ, सोन्या मारूती चौक, कमला नेहरू हॉस्पीटल येताना कस्तुरी चौक, मोमीन पूरा

०२ ४० मि.
म. गांधी स्टॅण्ड ते डेक्कन

मार्गे – काशिवाडी, नाना पेठ, सोन्या मारूती चौक, लक्ष्मी रोड, डेक्कन

०३ ३० मि.
पुणे स्टेशन ते डेक्कन

मार्गे – कलेक्टर कचेरी, अपोलो टॉकीज, वसंत टॉकीज, केसरीवाडा, डेक्कन

०३ २० मि.
पुणे स्टेशन ते डेक्कन

मार्गे – वेस्टएण्ड, नाना पेठ, सिटी पोस्ट, लक्ष्मी रोड

०३ ३० मि.
    एकुण ५०  

या बस लोकार्पण सोहळ्यास आमदार मा. माधुरीताई मिसाळ, आमदार मा. श्री. सुनिल कांबळे, आमदार मा. श्री. सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार मा. श्री. योगेश टिळेकर, भाजपचे पुणे शहराध्यक्ष मा. श्री. जगदीश मुळीक, पुणे मनपाच्या उपमहापौर मा. सौ. सुनिताताई वाडेकर, सभागृह नेते मा. श्री. गणेश बीडकर, माजी सभागृह नेते मा. श्री. धीरज घाटे, मा. श्री. राजेश पांडे, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त व पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. कुणाल खेमणार, सहव्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. चेतना केरुरे, वाहतूक व्यवस्थापक श्री. दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी श्री. चंद्रकांत वरपे, चिफ कोऑर्डीनेटर श्री. सुनिल बुरसे, कामगार व जनता संपर्क अधिकारी  श्री. सतिश गाटे, मुख्य अभियंता श्री. कैलास गावडे, स्वच्छता विभाग प्रमुख श्री. नितीन वांबुरे, स्वारगेट आगार व्यवस्थापक श्री. राजेश कुदळे, आगार अभियंता श्री. मनोहर पिसाळ यांची उपस्थिती होती.

देवेंद्रजी फडणवीस, विरोधी पक्षनेते : “पीएमपीएमएल व मेट्रो यांच्या समन्वयातून अशी योजना कार्यान्वित करा जेणेकरून एकाच तिकिटावर लोकांना पीएमपीएमएल बस व मेट्रोचा प्रवास करता येईल. यामुळे लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवतील. दहा रुपयात दिवसभर प्रवास ही कल्पनात्मक योजना साकारून पुण्यनगरीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक बससेवा माध्यमातून महानगरपालिकेकडून अभिनव योजना राबविली जात आहे. प्रदूषणमुक्त प्रवाशी वाहतूक व्यवस्थेसाठी ई बस व सीएनजी बसची आवश्यकता असून देशात सर्वात जास्त ई बस पीएमपीएमएल च्या ताफ्यात आहेत. तसेच पीएमपीएमएल कडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बस मार्गावर कोठे आहे, किती वेळात थांब्यावर येईल यासह इतर महत्वपूर्ण माहिती प्रवाशांना मिळावी यासाठी लवकरच मोबाईल app कार्यान्वित केले जाणार आहे, हि निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.”

चंद्रकांतदादा पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष : “दहा रुपयात दिवसभर प्रवास या योजनेमुळे वृद्ध नागरीक, महिला यांना या बससेवेचा चांगला लाभ होईल. मिडी बसमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात व पेठांमध्ये अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासाठी ही बससेवा प्रभावी ठरेल.”

मुरलीधर मोहोळ, महापौर पुणे मनपा : ” पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांच्या  माध्यमातून गेल्या साडेचार वर्षात पीएमपीएमएल च्या ताफ्यात १७९९ नवीन बस दाखल झाल्या आहेत. येत्या काळात आणखी नवीन बस दोन्ही महानगरपालिकांच्या माध्यमातून पीएमपीएमएलला दिल्या जाणार आहेत. दहा रुपयात दिवसभर प्रवास ही योजना मिडी सीएनजी एसी बसद्वारे राबविली जाणार असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात व दाट वस्तीच्या ठिकाणी निर्माण होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.”

हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष पुणे मनपा : “दहा रुपयांत दिवसभर एसी बस प्रवास या योजनेमुळे पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारक बदल होणार आहे. या योजनेमुळे उत्कृष्ठ दर्जाची सेवा अत्यल्प दरात शहरवासीयांना मिळणार आहे. या योजनेसाठी धावणाऱ्या मिडी बसेसमुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील व पेठांमधील पार्किंगची समस्या व वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.”