November 15, 2025

दुसऱ्या पीवायसी कासाग्रँड टेबलटेनिस साखळी स्पर्धेत एनप्लसवन ऍस्पिरंटस, वाडेश्वर विझार्ड्स संघांची विजयी सलामी

पुणे, दि.14 नोव्हेंबर 2025- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या पीवायसी कासाग्रँड टेबलटेनिस साखळी स्पर्धेत साखळी फेरीत एनप्लसवन ऍस्पिरंटस, वाडेश्वर विझार्ड्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत एनप्लसवन ऍस्पिरंटस संघाने बीएस फिनिशर्स संघाचा 5-1 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून राहुल पाठक, रणजित पांडे, तन्मय चोभे, विनय कुलकर्णी, मनीष शहा, भार्गव आठवले, रोहन पै, निखिल कानिटकर, संगीता वाळंबे,प्रशांत पंत, किरण खरे, नितीन पेंडसे यांनी सुरेख कामगिरी बजावली.

दुसऱ्या सामन्यात आरव श्रॉफ, अनिश राणे, भाग्यश्री देशपांडे, रोहन राजापूरकर, राजवीर बोरावके, वरद चितळे, विनीत रुकारी, ईशांत रेगे, प्रांजली नाडगोंडे, रियान माळी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर वाडेश्वर विझार्ड्स संघाने आयसिनर्जी स्कॉर्चर्स संघाचा 4-2 असा पराभव करून विजयी सुरुवात केली.

याआधी स्पर्धेचे उद्घाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव दिपक गाडगीळ, सह सचिव सारंग लागू आणि टेबल टेनिस विभागाचे सचिव तन्मय आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कासाग्रँडचे सहाय्यक व्यवस्थापक जवाहर सोनावणे, स्पर्धा संचालक नंदन डोंगरे, शिरीष साठे आदी उपस्थित होते.

निकाल: साखळी फेरी:
एनप्लसवन ऍस्पिरंटस वि.वि.बीएस फिनिशर्स 5-1(गोल्ड दुहेरी 1: राहुल पाठक/रणजित पांडे वि.वि.आशिष बोडस/नकुल ओगले 11-01, 11-10, 11-05; रोटेशनल एकेरी 1: तन्मय चोभे/विनय कुलकर्णी/मनीष शहा वि.वि.जया पाटणकर/देवेंद्र चितळे/आशिष देसाई 30-29; खुला दुहेरी 1: अनिल छाजेड/रोहित कर्णिक पराभुत वि.नकुल बेलवलकर/संतोष भिडे 15-14, 10-15, 09-15; रोटेशनल दुहेरी 2: भार्गव आठवले/रोहन पै/निखिल कानिटकर वि.वि.निरण भुरट/गिरीश मुजुमदार/अथर्व रोडे 30-28; खुला दुहेरी 2: संगीता वाळंबे/प्रशांत पंत वि.वि. तनय अंजीकर/मिहिर दिवेकर 15-10, 15-06; खुला दुहेरी 2: किरण खरे/नितीन पेंडसे वि.वि. समीर बेलवलकर/आरिन माळी 11-05, 11-06, 11-07)

वाडेश्वर विझार्ड्स वि.वि.आयसिनर्जी स्कॉर्चर्स 4-2(गोल्ड खुला दुहेरी 1: शिरीष कर्णिक/संजय बामणे पराभुत वि.मिहिर ठोंबरे/अतुल ठोंबरे 08-11, 09-11, 08-11; रोटेशनल एकेरी 1: आरव श्रॉफ/अनिश राणे/भाग्यश्री देशपांडे वि.वि.कौस्तुभ देशपांडे/राजेश भट/शिल्पा पांडे 30-18; खुला दुहेरी 1: रोहन राजापूरकर/राजवीर बोरावके वि.वि.अनिल कुलकर्णी/अनुपम कर्णिक 15-08, 15-12; रोटेशनल एकेरी 2: वरद चितळे/विनीत रुकारी/ईशांत रेगे वि.वि.अशोक जमेनीस/संजय शहा/सुदर्शन बिहानी 30-21; खुला दुहेरी 2: प्रांजली नाडगोंडे/रियान माळी वि.वि.व्यंकटेश कशेळीकर/श्रेयस भामरे 15-09, 08-15, 15-14; गोल्ड खुला दुहेरी 2: आदित्य दाते/मकरंद फडणीस पराभुत वि.आदित्य जितकर/नितीन कोनकर 11-08, 11-06, 06-11, 06-11, 08-11;