November 15, 2025

दुसऱ्या पीवायसी कासाग्रँड टेबलटेनिस साखळी स्पर्धेत एनप्लसवन ऍस्पिरंटस, वाडेश्वर विझार्ड्स संघांचा दुसरा विजय

पुणे, दि.15 नोव्हेंबर 2025- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या पीवायसी कासाग्रँड
टेबलटेनिस साखळी स्पर्धेत साखळी फेरीत एनप्लसवन ऍस्पिरंटस, वाडेश्वर विझार्ड्स या संघांनी दुसऱ्या विजयाची नोंद केली.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत रोहन राजापूरकर, राजवीर बोरावके, भाग्यश्री देशपांडे, ईशांत रेगे, गोपिका किंजवडेकर, रियान माळी, अदिती रोडे, आदित्य दाते, मकरंद फडणीस यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर वाडेश्वर विझार्ड्स संघाने एस कॅप्स वॉरियर्स संघाचा 4-2 असा पराभव केला. चुरशीच्या लढतीत एनप्लसवन ऍस्पिरंटस संघाने बेल्फिन्स टायगर्स संघावर 4-3 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. विजयी संघाकडून राहुल पाठक, रणजीत पांडे, संगीता वाळंबे, प्रशांत पंत, किरण खरे, नितीन पेंडसे, तन्मय चोभे यांनी सुरेख कामगिरी केली.

अन्य लढतीत बेल्फिन्स टायगर्स संघाने आयसिनर्जी स्कॉर्चर्स संघाचा 4-2 असा पराभव करून पहिला विजय मिळवला. तनिश बेलगलकर, दिपक सरंजामे, पराग देशमुख, दीपक गाडगीळ, सुनील मोगरे, प्रियदर्शन डुंबरे, संदीप साठे, सचिन बेलगलकर, पराग चोपडा यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.बीएस फिनिशर्स संघाने एस कॅप्स वॉरियर्स संघाला 4-2 असे पराभूत केले.

निकाल: साखळी फेरी:
बेल्फिन्स टायगर्स वि.वि.आयसिनर्जी स्कॉर्चर्स 4-2 (गोल्ड दुहेरी 1: तुषार नगरकर/प्रसाद पाटणकर पराभुत वि. आदित्य अभ्यंकर/नितीन कोनकर 07-11, 04-11, 07-11; रोटेशनल एकेरी 1: तनिश बेलगलकर/दिपक सरंजामे/पराग देशमुख वि.वि.कौस्तुभ देशपांडे/राजेश भट/शिल्पा पांडे 30-20; खुला दुहेरी 1: दीपक गाडगीळ/सुनील मोगरे वि.वि.व्यंकटेश कशेळीकर/संजय शहा 11-15, 15-10, 15-11; रोटेशनल एकेरी 2: प्रियदर्शन डुंबरे/संदीप साठे वि.वि.आदित्य जितकर/अनुजा कोल्हटकर 15-04, 15-06; गोल्ड दुहेरी 2: सचिन बेलगलकर/पराग चोपडा वि.वि.मिहीर ठोंबरे/अतुल ठोंबरे 02-11, 11-09, 02-11, 02-11);

बीएस फिनिशर्स वि.वि. एस कॅप्स वॉरियर्स 4-2(गोल्ड डबल्स 1: आशिष बोडस/नकुल ओगळे वि.वि.तन्मय चितळे/निखिल चितळे 11-08, 11-09, 11-10; रोटेशनल एकेरी 1: जया पाटणकर/देवेंद्र चितळे/ निरन भुरट पराभूत वि. सिद्धार्थ देशमुख/आदित्य पावनगडकर/चिन्मय चिरपुटकर 29-30; खुला दुहेरी 1: नकुल बेलवलकर/संतोष भिडे वि.वि. समीर पळनीतकर/प्रकाश वाळंबे 15-06, 15-13; रोटेशनल एकेरी 2: गिरीश मुजुमदार/आशिष देसाई/अद्वैत जोशी वि.वि.विहान राठोड/तन्मय आगाशे/शुभंकर शालगर 30-24; खुला दुहेरी 2: मिहीर दिवेकर/अथर्व रोडे वि.वि. श्रीकृष्ण आदिवरेकर/अभिजीत मराठे 15-04, 10-15, 15-14;; गोल्ड दुहेरी 2: समीर बेलवलकर/आरिन माळी पराभुत वि. कौस्तुभ वळिंबे/केदार नाडगोंडे 04-11, 04-11, 05-11);

वाडेश्वर विझार्ड्स वि.वि.एस कॅप्स वॉरियर्स 4-2(गोल्ड दुहेरी 1: शिरीष कर्णिक/संजय बामणे पराभुत वि.तन्मय चितळे/सिद्धार्थ देशमुख 07-11, 03-11, 07-11; रोटेशनल एकेरी 1: आरव श्रॉफ/अनिश राणे/प्रांजली नाडगोंडे पराभुत वि.कौस्तुभ वाळिंबे/आदित्य पावनगडकर/चिन्मय चिरपुटकर 29-30; खुला दुहेरी 1: रोहन राजापूरकर/राजवीर बोरावके वि.वि. प्रकाश वाळंबे/राजेश पारेख 15-00, 15-00; रोटेशनल एकेरी 2: भाग्यश्री देशपांडे/ईशांत रेगे/गोपिका किंजवडेकर वि.वि.
समीर पळनीतकर/विहान राठोड/तन्मय आगाशे 30-18; खुला दुहेरी 2: रियान माळी/अदिती रोडे वि.वि.श्रीकृष्ण आदिवरेकर/अभिजीत मराठे 15-13, 15-12; गोल्ड दुहेरी 2: आदित्य दाते/मकरंद फडणीस वि.वि.केदार नाडगोंडे/निखिल चितळे 11-07, 04-11, 11-04, 08-11, 11-05);

एनप्लसवन ऍस्पिरंटस वि.वि.बेल्फिन्स टायगर्स 4-3(गोल्ड दुहेरी 1: राहुल पाठक/रणजीत पांडे वि.वि. तुषार नगरकर/प्रसाद पाटणकर 11-08, 11-08, 11-04; रोटेशनल एकेरी 1: तन्मय चोभे/विनय कुलकर्णी/मनीष शहा पराभुत वि. तनिष बेलगलकर/दिपक सरंजामे/अनय 27-30; खुला दुहेरी 1: अनिल छाजेड/रोहित कर्णिक पराभुत वि. यश सारडा/रोहन जमेनिस 13-15, 06-15; रोटेशनल एकेरी 2:भार्गव आठवले/रोहन पै/बिपीन कुलकर्णी पराभुत वि. संदीप साठे/निनाद देशमुख/प्रदीप जोशी 29-30; खुला दुहेरी 2: संगीता वाळंबे/प्रशांत पंत वि.वि. प्रियदर्शन डुंबरे/दीपक गाडगीळ 15-11, 14-15, 15-13; गोल्ड दुहेरी 2: किरण खरे/नितीन पेंडसे वि.वि. सचिन बेलगलकर/पराग चोपडा 11-06, 11-09, 11-00; टाय ब्रेकर रोटेशनल एकेरी: नितीन पेंडसे/तन्मय चोभे/किरण खरे वि.वि.पराग चोपडा/सचिन बेलगलकर/तनिश बेळगलकर 30-27);