पुणे, 29/7/2022: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज (ता.२९) ओबीसी प्रवर्गासाठी सोडत करण्यात आली. 173 पैकी 46 जागा ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. या आरक्षणामुळे अनेक माजी नगरसेवकांना धक्का बसलेला आहे. विशेषतः यामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या नगरसेवकांना त्यांच्या ऐवजी घरातील महिलेला संधी द्यावी लागणार किंवा प्रतिष्ठापनाला लावून दुसऱ्या प्रभागात उमेदवारी मिळवावी लागणार आहे.
या सोडतीमध्ये शनिवार पेठ नवी पेठ प्रभाग क्रमांक 17 मध्ये तीन पैकी एक जागा ओबीसी महिला, दुसरी सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित आहे. तर तिसरी जागा खुल्या गटात असल्याने ओबीसी पुरुषाची अडचण झाली आहे. त्याचा फटका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना बसण्याची शक्यता आहे. हीच स्थिती प्रभाग क्रमांक 16 मध्ये असल्याने दीपक पोटे यांना अडचण होणार आहे. या प्रभागात महिलांमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्साखेच असणार आहे. प्रभाग क्रमांक 37 जनता वसाहत दत्तवाडी मध्ये एक जागा अनुसूचित जातीसाठी, दुसरी जागा ओबीसी महिला व तिसरी जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे शंकर पवार यांचीही जागा धोक्यात आलेली आहे. कोथरूडमध्ये प्रभाग क्रमांक ३२ येथे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात पुरुष इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने पक्षांतर्गत स्पर्धा जास्त आहे. प्रभाग क्रमांक 52 नांदेड सिटी सन सिटी येथे तीन पैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत त्यामुळे भाजपचे श्रीकांत जगताप व प्रसन्न जगताप यांच्यामध्ये रस्सीखेच होणार आहे.
सात प्रभागात सर्वसाधारण खुला गट नाही
58 पैकी सात प्रभागांमध्ये तिन्ही जागा आरक्षित असल्याने तेथे सर्वसाधारण खुला गटासाठी संधी नाही त्याचा फटका खुल्या गटात विशेषता पुरुष उमेदवारांना बसला आहे यामध्ये प्रभाग क्रमांक 21 कोरेगाव पार्क मुंढवा प्रभाग क्रमांक तीन लोहगाव विमान नगर प्रभाग क्रमांक 37 जनता वसाहत दत्तवाडी प्रभाग क्रमांक 39 मार्केट यार्ड महर्षी नगर प्रभाग क्रमांक 42 रामटेकडी सय्यद नगर प्रभाग क्रमांक 46 मोहम्मद वाडी उरळी देवाची प्रभाग क्रमांक 47 कोंढवा बुद्रुक येवलेवाडी या प्रभागांचा समावेश आहे.
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्र. १ – धानोरी – विश्रांतवाडी
अ – अनुसूचित जाती
ब – अनुसूचित जमाती महिला
क – सर्वसाधारण
प्रभाग क्र. २ – टिंगरेनगर – संजय पार्क
अ -ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३ – लोहगाव – विमाननगर
अ -अनुसूचित जाती महिला
ब – ओबीसी
क -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ४ – खराडी पूर्व-वाघोली
अ -अनुसूचित जाती महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५ – खराडी पश्चिम- वडगाव शेरी
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ६ – वडगाव शेरी – रामवाडी
अ -ओबीसी
ब – सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ७ – कल्याणी नगर – नागपूर चाळ
अ -अनुसूचित जाती
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ८ – कळस – फुलेनगर
अ -अनुसूचित जाती
ब – ओबीसी महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ९ – येरवडा
अ -अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. १० – शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी
अ -अनुसूचित जाती महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ११ – बोपोडी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
अ -अनुसूचित जाती
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. १२ – औंध – बालेवाडी
अ -अनुसूचित जाती
ब – ओबीसी महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. १३ – बाणेर – सुस – म्हाळुंगे
अ – ओबीसी महिला
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. १४ – पाषाण – बावधन बुद्रूक
अ -अनुसूचित जमाती
ब – ओबीसी महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. १५ – गोखलेनगर – वडारवाडी
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. १६ – फर्ग्युसन महाविद्यालय – एरंडवणे
अ -ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. १७ शनिवार पेठ – नवी पेठ
अ – ओबासी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. १८ – शनिवारवाडा – कसबा पेठ
अ – ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. १९ – छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम – रास्ता पेठ
अ -अनुसूचित जाती
ब -ओबीसी महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. २० – पुणे स्टेशन – मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता
अ – अनुसूचित जाती महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. २१ – कोरेगाव पार्क – मुंढवा
अ -अनुसूचित जाती महिला
ब -ओबीसी
क -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. २२ – मांजरी बुद्रूक – शेवाळेवाडी
अ -अनुसूचित जाती
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. २३ – साडेसतरा नळी – आकाशवाणी
अ – ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. २४ – मगरपट्टा – साधना विद्यालय
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. २५ – हडपसर गावठाण – सातववाडी
अ – ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. २६ – वानवडी गावठाण – वैदूवाडी
अ -अनुसूचित जाती महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. २७ – कासेवाडी – लोहियानगर
अ -अनुसूचित जाती
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. २८ – महात्मा फुले स्मारक – भवानी पेठ
अ -ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. २९ -घोरपडे उद्यान – महात्मा फुले मंडई
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३० – जय भवानी नगर – केळेवाडी
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३१ – कोथरूड गावठाण – शिवतीर्थनगर
अ – ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३२ – भुसारी कॉलनी – बावधन खुर्द
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३३ – आयडियल कॉलनी – महात्मा सोसायटी
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३४ – वारजे – कोंढवे धावडे
अ -ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३५ – रामनगर – उत्तमनगर
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३६- कर्वेनगर
अ – ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३७ – जनता वसाहत – दत्तवाडी
अ -अनुसूचित जाती
ब -ओबीसी महिला
क -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ३८ – शिवदर्शन – पद्मावती
अ -अनुसूचित जाती
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३९ – मार्केटयार्ड – महर्षीनगर
अ – अनुसूचित जाती महिला
ब – ओबीसी
क -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ४० – बिबवेवाडी – गंगाधाम
अ -ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ४१ – कोंढवा खुर्द – मिठानगर
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ४२ – रामटेकडी – सय्यदनगर
अ -अनुसूचित जाती महिला
ब -ओबीसी
क -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ४३ – वानवडी – कौसरबाग
अ – ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ४४- काळे बोराटे नगर – ससाणे नगर
अ -ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ४५ – फुरसुंगी
अ – ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ४६ – मोहमंद वाडी – उरुळी देवाची
अ -अनुसूचित जाती महिला
ब – ओबीसी
क -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ४७ – कोंढवा बुर्दूक – येवलेवाडी
अ -अनुसूचित जाती महिला
ब -ओबीसी
क -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ४८ – अप्पर सुपर इंदिरानगर
अ -अनुसूचित जाती महिला
ब -ओबीसी
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ४९- बालाजी नगर – शंकर महाराज मठ
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५० – सहकारनगर – तळजाई
अ -अनुसूचित जाती
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५१- वडगाव बुर्दूक- माणिकबाग
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५२ – नांदेड सिटी – सन सिटी
अ – ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५३ – खडकवासला – नऱ्हे
अ -ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५४- धायरी – आंबेगाव
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५५ – धनकवडी – आंबेगाव पठार
अ – ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५६- चैतन्यनगर – भारती विद्यापीठ
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५७ – सुखसागर नगर – राजीव गांधीनगर
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५८ – कात्रज – गोकुळनगर
अ – ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
——————-
More Stories
उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी ७५ दिवस ७५ शहरात ७५ कार्यक्रमांचे आयोजन
विश्वकर्मा विद्यापीठात स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ध्वजारोहण संपन्न