पुणे, दि. १३ डिसेंबर, २०२३ : परंपरेप्रमाणे आज जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या संभाजी उद्यानातील सवाई गंधर्व यांच्या पुतळयाला सवाई गंधर्व आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे कुटुंबीय यांनी एकत्र येवून पुष्पहार अर्पण केला. गेली ५० वर्ष सुरु असलेल्या या परंपरेनुसार सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सवाई गंधर्व आणि पं. भीमसेन जोशी यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्या शिष्य परंपरेतील गायक एकत्र येवून सवाई गंधर्व यांना आदरांजली वाहतात. आज या प्रसंगी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, विराज जोशी, शुभदा मुळगुंद, पं उपेंद्र भट, आनंद भाटे, डॉ प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे, पद्मा देशपांडे, शैला देशपांडे, श्रुती देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन