पिंपरी, दि. १ जुलै २०२५- हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,सामाजिक कार्यकर्ते नितिन चव्हाण, मुख्य लिपिक देवेंद्र मोरे, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे आणि महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
Pune: चाकण भागातील सव्वादोनशे अतिक्रमणावर हातोडा
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १४१ शाळांमध्ये आफ्टर-स्कूल मॉडेलची सुरुवात
PCMC: ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन मालमत्ता कर भरा आणि मिळवा ४ टक्के सवलत!