पुण्यात १ तर पिंपरी चिंचवडमध्ये ६ जनांना ओमिक्रॉनचा संसर्ग  

पुणे, ५/११/२०२१: पुणे शहरात एक तर पिंपरी चिंचवडमध्ये सहा जनांना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नायजेरिया देशातून आपल्या भावाला भेटायला आलेली ४४ वर्षे महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली, पिंपरीचिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि दोन मुली अशा सहा लोकांना, तर पुण्यात एका ४७ वर्षे पुरुषाला या नव्या व्हेरियंटचा संसर्ग झाला आहे. आता राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या आठ झाली आहे.

 

पिंपरीचिंचवड येथील नमुन्यांची चाचणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) आणि पुण्यातील चाचण्यांची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) चाचणी केली. नायजेरीयावरून आलेल्या महिलेला सौम्य लक्षणे असून, इतरांना कोणत्याच प्रकारची लक्षणे नाही. पुणे शहरातील रूग्ण हा नेहमीच्या सर्वेक्षणातून आढळला आहे. तो नोव्हेंबर महिन्यात फिनलंड येथे गेला होता. थोडासा ताप आला म्हणून नोव्हेंबर महिन्याच्या २९ तारखेला त्यांनी कोरोनाच्या चाचणीसाठी नमुना दिला होता. यांचीही लक्षणे सौम्य आहे. एकंदरीत राज्यात ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णांची लक्षणे सौम्य असून, प्रकृतीही स्थिर आहे. राज्यात अतिजोखमीच्या देशातून दाखल होणाऱ्या प्रवाशांची कोरोना निदान करण्यात येत असून, विलगीकरणही करण्यात येत आहे.