पुणे, 24/02/2025: “छत्रपती शिवाजी महाराजांचे आचरण, त्यांचे ओजस्वी विचार आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. चांगल्या समाजासाठी महाराजांचे हे आचार व विचार प्रत्येकाने आत्मसात करावेत,” असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतात, असेही कांबळे यांनी नमूद केले.
खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी कांबळे बोलत होते. विजेत्यांना रोख बक्षीस व स्कुल बॅग देण्यात आले. प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नवनाथ पारगे, माजी सरपंच लक्ष्मण माताळे, शिवसेना नेते संतोष शेलार, तंटामुक्ती अध्यक्ष शरद पारगे, माजी उपसरपंच शुभांगी खिरीड, राष्ट्रवादी नेते शशिकांत किवळे, कैलास मोरे, तेजश्री डिंबळे, महेश दिवार, विकी भालेराव, वैभव म्हसगुडे, प्रसाद पायघन, विद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग फापाळे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य व एकता युवक संघ गोऱ्हे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. खेडशिवापूर व खानापूर जिल्हा परिषद गटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये ७२८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर