पुणे, दि. २ नोव्हेंबर, २०२३ : पुण्यातील हातकागद संस्थेच्या वतीने नागरिकांना कलात्मक आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करता यावी, या उद्देशाने येत्या शनिवार ४ व रविवार ५ नोव्हेंबर रोजी ‘इको दिवाळी बाजार’चे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाजवळील आवारात सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन संपन्न होणार आहे. प्रदर्शनात सर्वांना विनामूल्य प्रवेश असेल, याची कृपया नोंद घ्यावी.
दिवाळीच्या खरेदीसोबतच कारागीर, कलाकार, सामाजिक संस्था यांनी तयार केलेल्या वस्तू आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी पुणेकर नागरीकांना उपलब्ध होणार असून स्वत:च्या हाताने कंदील बनविण्याचा अनुभवही या ठिकाणी आयोजित कार्यशाळेत नागरिकांना घेता येणार येणार आहे.
पुणे हँडमेड पेपर्सच्या वैशिष्ट्यपूर्ण हँडमेड पेपर कंदील आणि इतर पर्यावरणपूरक सजावट साहित्य हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असेल याबरोबरच इतर सामाजिक संस्थांनी, कलाकार, कारागिरांनी हाताने तयार केलेल्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक वस्तू हे ही प्रदर्शनाचा केंद्रबिंदू असेल. यामध्ये प्रामुख्याने पारंपारिक आकाशदिवे, हाताने बनविलेली शुभेच्छापत्रे, घर सजावटीच्या वस्तू, हातकागद आणि पेपर मॅशे यांपासून बनविलेल्या वस्तू यांचा समावेश आहे. या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सामाजिक संस्थांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.
पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ‘इको-दिवाळी बाजार’ खरेदीचा एक संपन्न असा अनुभव नक्की देईल. या कार्यक्रमात स्वयंसेवी संस्था, नवे स्टार्टअप्स आणि विशेष व्यक्तींना विक्री करण्यासाठी खास अशा विभागाची सोय करण्यात आली आहे. या प्रदर्शनीमध्ये सहभागी होत नागरिकांनी कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासोबतच पंतप्रधानांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ उपक्रमाला सक्रियपणे पाठिंबा द्यावा असे आवाहन या वेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
इच्छुकांसाठी आयोजित करण्यात येणारी कंदील बनविण्याची विशेष कार्यशाळा वा अधिक माहितीसाठी हातकागद संस्थेच्या https://punehandmadepapers.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन