November 9, 2025
Punekar News Marathi Logo

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

पुणे, दि. १७: मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, तिचे संवर्धन व भरभराट होण्यासाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून भाषा संचालनालयाच्या विभागीय कार्यालयाच्यावतीने नवीन मध्यवर्ती इमारत येथे भाषा संचालनालयाच्या प्रकाशनांचे व अन्य सहित्यग्रंथांचे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

नवरोसजी वाडिया कॉलेजचे प्राचार्य वसंत चाबुकस्वार व प्रबंधक राजेंद्र तागडे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी विभागीय सहायक भाषा संचालक नवी मुंबई यो. ल. शेट्टे, विभागीय सहायक भाषा संचालक पुणे श. कि. यादव, पर्यवेक्षक संदिप साबळे, अधीक्षक सु. बा. शिरसाट, अनुवादक ज्यो. नि. विभुते आदी उपस्थित होते.

प्रदर्शनात शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागाराच्यावतीने उच्च शिक्षण विभाग, साहित्य आणि संस्कृती मंडळ, विधान मंडळ, पुराभिलेख, लोकसाहित्य, भाषा संचालनालय, विश्वकोश, दर्शनिका विभाग, पर्यटन विभाग, सामान्य प्रशासन आदी विभागाची प्रकाशने ठेवण्यात आली. प्रदर्शनास नवीन मध्यवर्ती इमारत येथील शासकीय कर्मचारी व नागरिकांनी भेटी देवून वाचनीय ग्रंथ खरेदी केली.