पुणे, 31 ऑक्टोबर 2022: भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत जिल्ह्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ दिली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक श्रीहरी पाटील, पोलीस निरीक्षक गिरीष सोनवणे आदी उपस्थित होते.
या वर्षी दक्षता जनजागृती सप्ताह ‘भ्रष्टाचार मुक्त भारत – विकसित भारत’ या संकल्पनेसह साजरा करण्यात येत आहे. कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी याबाबत संबंधित नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. भ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असल्याने दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४, पुणे कार्यालय दू.क्र.- ०२०-२६१३२८०२, २६१२२१३४ संकेतस्थळ – www.acbmaharashtra.gov.in, ईमेल dyspacbpune@mahapolice.gov.in, मोबाईल ॲप www.acbmaharashtra.net.in किंवा ७८७५३३३३३३ या क्रमांकावर व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश करुन तक्रार नोंदवावी असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा