Pune University

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जनजाती नायकांचे योगदान कार्यक्रमाचे आयोजन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुणे, दि.१६/११/२०२२- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जनजाती नायकांचे योगदान या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता होणार असून या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, मध्यप्रदेश, जनजातीचे अभ्यासक लक्ष्मण सिंह मरकाम, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सेवा अधिकारी आर.एस. मिश्रा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमामध्ये आदिवासी लोककला, आदिवासी समुदायाच्या जीवनावरील चित्र प्रदर्शन, ध्वनी चित्रफीत आदी भरगच्च कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक व कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.संतोष परचुरे यांनी दिली.