पुणे, दि. ११ डिसेंबर, २०२३ : कै शशिकांत जोशी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, संजय जोशी यांच्या संकल्पनेतून आणि जोशी माटेगांवकर परिवाराच्या वतीने येत्या रविवार दि. १७ डिसेंबर रोजी ‘स्मृति सुंगध‘ या मराठी व हिंदी गीतांच्या विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. मयूर कॉलनी येथील बालशिक्षण सभागृह या ठिकाणी सकाळी ९.३० वाजता सदर कार्यक्रम संपन्न होणार असून यासाठी सर्वांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विनामूल्य प्रवेश देण्यात येईल. काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.
सुप्रसिद्ध गायिका सुवर्णा माटेगांवकर, गायक संदीप उबाळे, स्वप्नजा लेले आणि देवव्रत भातखंडे हे कलाकार यावेळी ‘स्मृति सुंगध‘ या कार्यक्रमात आपली कला सादर करतील तर सुप्रसिद्ध गायिका, अभिनेत्री आणि संगीतकार असलेली केतकी माटेगांवकर यांचा विशेष सहभाग कार्यक्रमात असणार आहे. यावेळी पराग माटेगांवकर हे संवादिनीवर साथसंगत करतील शिवाय संगीत संयोजनाची जबाबदारी देखील पार पाडतील. विवेक परांजपे, केदार परांजपे, निलेश देशपांडे, विशाल गंड्रतवार, केदार मोरे, अभय इंगळे हे वादक कलाकार देखील कार्यक्रमामध्ये सहभागी असतील.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन