पुणे, दि. २ नोहेंबर, २०२३ : दिवाळी म्हणजे स्वतःसोबतच, आप्तेष्ट-मित्रमंडळी आणि घरासाठीदेखील मनसोक्त खरेदी हे समीकरण ठरले आहेच. नवीन वस्तूंची खरेदी करताना आज प्रत्येकजण त्यामध्ये नावीन्यपूर्ण आणि वेगळं असं काहीतरीच्या शोधात असतो. हेच लक्षात घेत, पुण्यातील सहा कलाकार मैत्रिणींनी एकत्र येऊन ‘स्टोरीज हॅंडमेड’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. येत्या शनिवार दि. ४ नोव्हेंबर आणि रविवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत शिवाजीनगर, मॅाडेल कॅालनी पोस्ट ऑफिस समोरील रवी परांजपे स्टुडियो या ठिकाणी सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे याची नोंद घ्यावी.
हाऊस ऑफ राजसीच्या संस्कृत महाकाव्य आणि शास्त्रीय संगीतातील रचना चित्रीत केलेल्या साड्या, ज्यो क्राफ्टस् अँड क्विल्ट्सच्या १००% सूती आणि पूर्णपणे क्विल्टींग केलेल्या गोधड्या, मृत्तिका टेराकोटा पॅाटरीचे आधुनिक आणि पारंपारिक पद्धतीने केलेले दिवे, लॅंपशेड्स, म्युरल प्लेट्स आणि शोभेच्या वस्तू, ‘रेशीम’ ब्रॅंडच्या हॅंड एम्ब्रॅायडरीनी केलेले किचेन होल्डर्स, फ्रेम्स, टी-ट्रे, घड्याळे, विस्मया एथ्निसीटी ब्रॅंडच्या भारतीय पारंपारिक फॅब्रिक्स आणि टेक्निक्स वापरून केलेल्या लेदरच्या हॅंडबॅग्ज आणि ‘इंक एन् मी’च्या रंगीबेरंगी इलस्ट्रेशन्स वापरून केलेल्या अनेक रंजक वस्तू यां प्रदर्शनामध्ये सर्वांना पाहता आणि खरेदी करता येणार आहेत.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार