पुणे, दि. ०६/०३/२०२५: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, पुणे व यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स आणि यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता यशस्वी भवन, एल्प्रो चौक, प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहापुढील चौक, चिंचवड गाव येथे ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध उद्योजकांनी रिक्तपदे कळविली असून किमान १० वी, १२ वी, पदवीधर अशा विविध पात्रताधारक महिला उमेदवारांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक महिला उमेदवारांनी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्त पदांसाठी अर्ज करावा. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रेझ्यूमे) प्रती सोबत आणाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे ११ येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्र. सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले आहे.
More Stories
पुण्यात प्राण्यांवरील अत्याचाराविरोधात जोरदार मोर्चा
“जैन धर्माच्या पवित्र जागेचा सौदा – ट्रस्टकडून बिल्डरच्या घशात जमीन घालण्याचा डाव!”
Pune: उंड्रीमध्ये एका सदनिकेत आगीची घटना; एक मृत तर पाच जखमी