पहिल्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत परमार ऑल स्टार्स संघाला विजेतेपद

पुणे, 22 सप्टेंबर, 2022: पहिल्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत उपांत्य फेरीत परमार ऑल स्टार्स संघाने बॉल ब्रेकर्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

पुना क्लब स्नूकर हॉल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत विजेतेपदसाठीच्या लढतीत परमार ऑल स्टार्स संघाने बॉल ब्रेकर्स संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत विजेतेपद पटकावले. 15रेड हँडीकॅप स्नूकर एकेरी गटात नवीन कोचरने विनोद मखीजाचा 108-79 असा तर दुहेरीत सिद्धार्थ मोदी व दशमेश कालरा या जोडीने आदित्य एस व संजय जाधव यांचा 118-71 असा पराभव केला. हँडीकॅप बिलियर्ड्स गटात संजय दीडी याने आर.के शर्माचा 200-182 असा पराभव करत संघाला विजेतेपद पटकावून दिले.

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र बिलियर्ड्स अँड स्नूकर संघटनेचे अध्यक्ष राजन खिंवसरा, पुना क्लब लिमिटेडचे उपाध्यक्ष सुनील हांडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कपिल पंजाबी, विघ्नेश सांघवी, संजय सांघवी, मुकेश सांघवी, स्पर्धा संचालक रणजीत पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
परमार ऑल स्टार्स वि.वि. बॉल ब्रेकर्स 3-0 (15रेड हँडीकॅप स्नूकर एकेरी: नवीन कोचर वि.वि. विनोद मखीजा 108-79; दुहेरी: सिद्धार्थ मोदी/दशमेश कालरा वि. वि. आदित्य एस/संजय जाधव 118-71; हँडीकॅप बिलियर्ड्स: संजय दीडी वि.वि आर.के शर्मा 200-182).