पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कचरावेचकांचा ऐतिहासिक विजय, वाढीव वेतानामधून पूरग्रस्तांकरिता एक लाख देणगी

पिंपरी चिंचवड, १६ ऑगस्ट २०२१: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील कंत्राटदारांकडे काम करणाऱ्या कचरावेचकांनी मुख्यमंत्री मदत निधीकरिता महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. याकरिता निमित्त होते ते महाराष्ट्र शासनाच्या दि. २४ फेब्रुवारी २०१५ च्या अधिसूचनेनुसार मान्य केलेले किमान वेतनाचे दर कचरवेचकांना देखील लागू केले जावे म्हणून दिलेला दीर्घ लढा यशस्वी ठरल्याबद्दल आयोजित केलेल्या आनंद सोहोळयाचे, ज्यामुळे  कचरावेचकांच्या वेतनात दरमहा रु. ५०००/- एवढी वाढ झाली. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव व पिंपरी चिंचवडच्या महापौर मा. माई ढोरे देखील कार्यक्रमास उपस्थित होते.


“कचरावेचकांची चळवळ आज बरीच पुढे गेली आहे. कचरा वेचकांचे मुद्धे नुसते पगारापर्यंत मर्यादित नाही पण माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारांशी जुडलेले आहेत. अश्याच उत्साहाने आम्ही सर्व यापुढेही सर्व काचरावेचाकांचे घन कचरा व्यवस्थापनात समावेश व्हावे यासाठी लढत राहणार” कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्या पूर्णिमा चिकरमाने म्हणाल्या. मा. माई ढोरे म्हणतात, “कचरावेचाकांनी दिलेल्या १ लक्ष रुपयांना कोटी कोटी रुपयांपेक्षा जास्त मान आहे. सर्वांना मी सलाम करते” संघटनेच्या कार्यकारिणीवरील एक सभासद म्हणतात, “ आमचे पगार वाढले याचा आम्हाला आनंद आहेच. परंतु गेली दोन वर्षे महिलांचे अतोनात हाल झाले आहेत, कारण घरात रेशन भरण्याची जबाबदारी शेवटी महिलांवरच पडते. आमच्या मदतीमुळे अडचणीच्या परिस्थितीतील काही महिलांना तरी दिलासा मिळेल अशी आम्ही आशा करतो.”


कचरावेचक शीतल गिरमकर म्हणतात, “आमचे पगार वाढले याचा आम्हाला आनंद आहेच. परंतु रस्त्याच्या कडेला किंवा लँडफीलमधुन कचरा गोळा करणाऱ्या कचरावेचकांचं काय? ते वयाने जास्त आहेत आणि अधिक कमकुवत आहेत. त्यांना देखील घनकचरा व्यवस्थापनाच्या व्यवस्थेमध्ये सामावून घेण्याचा काहीतरी मार्ग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शोधायला हवा आणि मोशी येथे भरून वाहत असलेला सुका कचरा त्यांना उपलब्ध करून द्यायला हवा. तसेच रेशन, पेन्शन यासारख्या सामाजिक सुरक्षा सुविधांचे लाभ देखील त्यांना मिळायला हवेत. 


विजया चव्हाण या आणखी एक कचरावेचक सभासद, काही कळीचे प्रश्न उठवताना म्हणतात, “१ जानेवारी २०२० पासूनची थकबाकी दिली जाईल असे आम्हाला सांगितले गेले आहे. परंतु त्यापूर्वीच्या कालावधीतील आमच्या कामाचे काय? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसारखी सरकारी स्वराज्य संस्था देखील किमान वेतन कायद्याला एवढे किरकोळ महत्व देत असेल, आणि त्याची अंमलबजावणी करण्यात एवढी कहालढकल करीत असेल तर खाजगी क्षेत्राकडून काय अपेक्षा ठेवायची?”


ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव म्हणाले, “आज मला सर्व भागीनांचा अतिशय अभिमान वाटत आहे. माझी डॉ. नीलम गोऱ्हे आणि मा. माई ढोरे यांच्या कडे एक मागणी आहे – पुण्यात कार्यरत असलेली काचरावेचाकांची स्वच्छ संस्था यासारखे मॉडेलचा आपण इथेही विचार करावा” नीलम गोऱ्हे यांनी आश्वासन दिले कि त्या काचरावेचाकांच्या सर्व मागण्या – कचरावेचाकांसाठी जागा, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसोबत सर्व कल्याणकारी योजना कचरावेचकांना मिळत आहे याची खात्री – पुढे घेऊन जाणार. 


“मी पुण्यातील स्वच्छ संस्थेचे कचरावेचक आणि पिंपरी चिंचवड मध्ये कंत्राट पद्धतीने कार्यरत असलेले कचरावेचक यांच्या  सर्व समस्यांचे निराकरण करणार” असं मा. नीलम गोऱ्हे म्हणाल्यात.