पिंपरी चिंचवड : शिक्षणासाठी परदेशी जाणारे विद्यार्थी, स्तनदा माता, दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी ड्राईव्ह इन लसीकरण उपक्रम

पिंपरी,दि. २९ मे २०२१: लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर प्रत्यक्ष केंद्रात न जाता, गाडीमध्ये बसूनच लसीचा डोस घेब्याची सुविधा ‘ड्राइव्ह-इन लसीकरण’ या उपक्रमाद्वारे नागरिकांना मिळणार आहे. मात्र शिक्षणासाठी परदेशी जाणारे विद्यार्थी, स्तनदा माता, दिव्यांग व्यक्ती, अंथरुणावर खिळलेले जेष्ठ रूग्ण यांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

या ठराविक वर्गातील नागरिकांना जलद लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ड्राईव्ह-इन लसीकरण उवक्रम राबविला जाणार आहे.

या उपक्रमांतर्गत नागरीकांना वाहनांमधून बाहेर न पडता लसीचा शॉट घेता येणार आहे. यासाठी ‘मी जबाबदार’ या अधिकृत ॲपद्वारे दि. १ जूनपासून नोंदणी करता येणार आहे अशी माहिती कोव्हीड -१९ रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिम जलदगतीने राबविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने हा उपक्रम राबविला जाणार असून, याद्वारे शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, १८ ते ४४ वर्षे वयोगटातील दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी तसेच एक वर्षापेक्षा लहान बाळ असणाऱ्या स्तनदा मातांसाठी अशाप्रकारे लसीकरण केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. याव्यतिरिक्तआजारामुळे अंथरुणावर असलेले रुग्ण तसेच विशेष व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन कोव्हीड १९ रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या ‘मी जबाबदार’ ॲपवर या लसीकरणासाठी दि.१ जून पासून नोंदणी करता येणार आहे.