पिंपरी चिंचवड मध्ये ५ डिसेंबरला अर्ध मॅरेथॉन  

पिंपरी-चिंचवड, 18/11/2021 : येथे अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात 21 कि.मी, 10 कि. मी. व 5 कि. मी. असे प्रकार आहेत.

 

शत्रृघ्न काटे युथ फाउंडेशन आणि उन्नती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व सहकार्याने किशान स्पोर्टस इंडिया प्रा लि. ने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहेत.

 

“उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी रस्ते सुरक्षा” असा संदेश देण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हे स्वतः या स्पर्धेत सहभागीही होणार आहेत.

 

पीसीएमसीचे आयुक्त राजेश पाटील हे देखील त्यांच्याबरोबर स्पर्धेत सहभागी होणार आहेत. २९ वेळा आयर्न मॅनचा किताब मिळवलेले डॉ. कौस्तुभ राडकर यांची उपस्थिती हे या स्पर्धेचे आकर्षण असणार आहे. विजेत्यांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे, तसेच सहभागींना पदक, टी शर्ट, आरोग्यदायी न्याहरी, प्रमाणपत्र, गुडी बॅग व फोटो भेट म्हणून देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे स्थळ पिंपळे-सौंदागर हे असून येथूनच ही स्पर्धा सुरू होईल.

 

कोरोनाच्या संकटानंतर आयोजित केलेली ही दुसरीच स्पर्धा असल्यामुळे, त्यास स्पर्धकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

 

येथे नोंदणी करा:

https://www.townscript.com/e/pimpri-chinchwad-half-marathon-2021