ओमिक्रॉनचा बंदोबस्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज; आयुक्तांनी घेतली बैठक

पिंपरी, ३०/११/२०२१: आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना आणि त्यासंदर्भात आवश्यक व योग्य पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ओमायक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी यांची आज (मंगळवारी) बैठक घेण्यात आली.

‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की मागील १५ दिवसांमध्ये परदेशातुन पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात आलेल्या नगरीकांची माहिती पिं.चिं.मनपामार्फत कार्यान्वीत करण्यात आलेल्या कोविड हेल्पालाईन क्रमांक ८८८८००६६६६ वर कळविण्यात यावी. जेणेकरुन परदेशातुन आलेल्या नागरीकांची RT-PCR टेस्ट करण्यात येईल. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर संस्थात्मक अलगीकरण (Institutional Quarantine)कक्षात ठेवुन वेळेत उपचार करण्यात येतील व सानिध्यात आलेल्या व्यक्तींना गृह अलगीकरण (Home Quarantine) कक्षात राहण्याच्या सूचना देण्यात येतील. जेणेकरुन विषाणूच्या प्रसार टाळणेस मदत होईल.