पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कोट्यवधीची उड्डाणे; ७९ कोटीच्या खर्चास मान्यता

पिंपरी, दि. ७ जुलै २०२१ :- महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या येणा-या आणि झालेल्या सुमारे ७९ कोटी १२ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने मागील तहकूब व आजची सभा पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते. शहर झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत लिंकरोड पत्राशेड पॅकेज क्र.७ अ मधील इमारतींची स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, जलनि:सारण कामांची दुरुस्तीची कामे करण्याकामी येणा-या ४ कोटी १९ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

क प्रभागातील जलनि:सारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पध्दतीने साफसफाई करणे व चोकअप काढण्यासाठी येणा-या ३३ लाख ७७ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. ब क्षेञीय कार्यक्षेञातील प्रभाग क्र.१७,२२ मधील शौचालय/मुतारी ११० सिट्सची मनुष्यबळ व यांत्रिकी पध्दतीने तसेच आवश्यक रसायने वापरून दिवसातून ४ वेळा साफसफाई करणेबाबत येणा-या ५३ लाख ५४ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

ब क्षेञीय कार्यक्षेञातील प्रभाग क्र.१६ तसेच प्रभाग क्र.१८ मधील शौचालय आणि मुतारी मनुष्यबळ व यांत्रिकी पध्दतीने तसेच आवश्यक रसायने वापरुन साफसफाई करणेबाबत अनुक्रमे ८१ लाख आणि १ कोटी ९ लाख अशा एकूण १ कोटी ९० लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.६ मधील सद्गुरु नगर, लांडगे वस्ती, महादेव नगर व परिसरात स्थापत्य विषयक सुधारणेची कामे करण्याकामी येणा-या ३७ लाख ८ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाच्या विविध विभागांसाठी, वैद्यकिय विभाग, विविध रुग्णालये यांचेसाठी नियमितपणे दैनंदिन कामकाजासाठी वेळोवेळी आवश्यकतेनुसार तसेच मागणीनुसार करावयाच्या छपाई साहित्याच्या कामासाठी येणा-या ६० लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

पिंपळे निलख आ.क्र.३९८ येथे उद्यान विकसित करण्याकामी येणा-या ५७ लाख ६८ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

चिंचवड मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.१९ मधील संतोषनगर, दळवीनगर, विजय नगर व इतर परिसरात जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करणे व उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्याकामी येणा-या ३९ लाख २३ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.२२ मधील काळेवाडी, आदर्श नगर, पवनानगर व इतर परिसरातील जलनिःसारण विषयक सुधारणा कामे करणे व उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्यासाठी येणा-या २९ लाख ४० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

सन २०१९-२० मधील देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सवलतीच्या दरातील पासेसपोटी पुणे परिवहन महामंडळास ३ कोटी २० लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे रावेत स.नं.९६ येथे पर्यायी फीडरची व्यवस्था आणि अनुषंगिक कामे करण्याकामी येणा-या ५५ लाख ९० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

पुणे आळंदी रस्त्यापासून च-होली-लोहगाव हद्दीपर्यंतच्या विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्याकामी आणि विद्युत विषयक कामे करण्यासाठी येणा-या १ कोटी ५ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

महापालिकेचे माध्यमिक विद्यालयासांठी मराठी माध्यमा करिता ८८, ऊर्दु करीता २३ शिक्षक नेमणुक करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यालये सुरु झाल्यानंतरच्या ६ महीन्यासाठी येणा-या १ कोटी १६ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

भोसरी, जिजामाता, थेरगांव व आकुर्डी रुग्णालयाकरीता रुग्णांच्या उपचाराकरीता आवश्यक द्रव ऑक्सिजन आणि मेडीकल गॅस लिक्वीड ऑक्सीजन पुरवठा करण्याकामी येणा-या ५ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ३२ मधील श्रीकृष्ण मंदीर ते बँक ऑफ महाराष्ट्र ते सांगवी फाटा पर्यंत व परीसरातील रस्ते अद्ययावत पध्दतीने विकसित करण्याकामी येणा-या २८ लाख ६१ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. २१ पिंपरी मधील नव्याने विकसीत करणेत येणा-या रस्त्यामध्ये जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करण्याकामी येणा-या ३३ लाख ६७ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.६ मधील पुणे नाशिक रस्त्याच्या पुर्व बाजूस रस्त्यांचे चर व खड्डे खडीमुरुमाने व एम.पी.एम.पध्दतीने बुजविण्यासाठी येणा-या ४० लाख ९४ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

वार्ड क्र.१५ मोहननगर कमान ते मेहता हॉस्पिटल रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे मध्ये विद्युत विषयक कामे करण्याकामी येणा-या ८१ लाख २२ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या विविध विभागांना आवश्यक १५० नग प्रिंटर्स खरेदी करण्याकामी येणा-या ३५ लाख ६९ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

त्रिवेणीनगर चॊक तळवडे येथील स्पाईन रस्त्याने बाधीत मिळकत धारकांचे पुनर्वसन प्रभाग क्र.८ मधील पेठ क्र.११ येथे करणेत येत असलेल्या ठिकाणी ले आऊट मधील अंतर्गत रस्ते विकसित करणे व सुविधा पुरविणेसाठी विद्युत विषयक कामे करण्यासाठी येणा-या ६९ लाख ७७ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.७ सर्व्हे क्र.१ आरक्षण क्र.४३० येथे नव्याने होणा-या प्राथमिक शाळा इमारतीचे विद्युत विषयक कामे करण्याकामी येणा-या ६८ लाख १० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र.२०, ३०, ३१ व ३२ मधील मनपाचे शौचालय मुता-यांची दिवासातून किमान दोन वेळा तरी यांत्रिक पध्दतीने (पाण्याचे उच्चदाबाचे सहाय्याने) व मनुष्यबळाद्वारे दैनंदिन साफसफाई देखभाल व किरकोळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे. तीन महिन्याकरीता येणा-या ४८ लाख ३१ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

ब क्षेञीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र. १८ मधील चिंचवड, केशवनगर परिसरामध्ये वार्षिक ठेकेदारी पद्धतीने ड्रेनेज लाईन व चेंबर्सची देखभाल दुरुस्ती करण्याकामी येणा-या २५ लाख ९६ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

तळवडेगाव परिसरातील जलनिःसारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी येणा-या २६ लाख २९ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

सेक्टर नंबर २७ नर्सरी व तळवडे गायरान ग अ नं.१ ब येथे वृक्षारोपणाची रोपे तयार करण्याकामी १२ महीन्यांसाठी येणा-या ४४ लाख ५१ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

वायसीएम रुग्णालयातील कान नाक व घसा या विभागाकरिता म्युकरमायकोसिस या आजारावर उपयायोजना करण्याकामी तातडीने उपकरणे आणि साहित्य खरेदीसाठी येणा-या १ कोटी २ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.