पिंपरी-चिंचवड: शहरात रविवारी महानगरपालिकेच्या ५७ लसीकरण केंद्रावर दुसऱ्या डोस चे लसीकरण

पिंपरी, दि.२९ मे २०२१ : शासनाकडून देण्यात आलेल्या सुचनेनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ५७ लसीकरण केंद्रावर दुसऱ्या डोस’चे लसीकरण केले जाणार आहे.

यावेळी कोव्हॅक्सिन’ चा दुसरा डोस हा २८ दिवस पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत लस देण्यात येईल.

तर ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला व दुसरा डोस वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ५७ लसीकरण केंद्रावर प्रत्येकी १०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल. रविवारी (दि.30) लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे या वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.