पिंपरी : करोना रुग्णांचा नातेवाईकांशी व्हिडीओ कॉलद्वारे थेट संपर्क ; नेहरुनगर जम्बो कोविड सेंटरमधील उपक्रम

पिंपरी, दि. 16 मे 2021: – कोरोना रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच त्यांचे मनोधर्य वाढवून मानसिक स्वास्थ्य मजबूत होण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने नेहरुनगर जम्बो कोविड सेंटरमध्ये एक अभिनव उपक्रम राबविला आहे. याठिकाणी रूग्ण आणि नातेवाईक यांना व्हिडीओ कॉलद्वारे थेट संपर्क साधता येणार.

या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी कोरोना बाधित रुग्णांशी आज महापौर माई ढोरे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील यांनी व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला.

आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या संकल्पनेतून कोरोना रुग्णांचा नातेवाईकांशी संवाद हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून त्याचे नियोजन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे करीत आहेत.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, ”
कोविड रूग्णालयात दाखल असणाऱ्या रूग्णांना त्यांचा आप्तेष्टांशी संपर्क होत नसल्यामुळे रुग्णांमध्ये नैराश्य येण्याची शक्‍यता असते. ते नैराश्य दूर करण्यासाठी कुटूंबियांशी व्हिडीओ कॉलींगद्वारे संवाद साधल्यामुळे उर्जा निर्माण होवून रूग्ण बरा होण्यास मदत होते. या उपक्रमामुळे कोविड रुग्ण आजारातून लवकरात लवकर बरे होतील अशी आम्हाला आशा आहे.