पुणे: दोन दिवस कर्मचाऱ्यांना कंपन्यास बोलू नका, वर्क फ्रॉम होमची परवानगी द्या 

पुणे, १३ जुलै २०२२: पुण्यात उद्यापासून दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे आयटी व इतर सर्व खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.

हवामान विभागाने उद्या आणि परवा पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे, त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने हे आवाहन करत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे.

गुरुवारी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, त्यानंतर आता आयटी कंपन्या व इतर खासगी कंपन्यांनी कर्मचार्यांना कामावर बोलवू नये, त्याऐवजी घरून काम करण्याची मुभा द्यावी असे आव्हान महापालिकेने केले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना आधीच खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक मांडलेली आहे अतिवृष्टीमुळे नदी, ओढे, नाल्यांना पूर येऊ शकतो. तसेच रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. यातून अपघाताची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची व द्यावी असे आवाहन कंपन्यांना केलेले आहे.