पुणे: उपायुक्तांकडे कोट्यावधीचे घबाड, एसीबीकडून दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल

पुणे, दि. ०५/०७/२०२२: बेकायदेशिररित्या संपत्ती जमविल्याप्रकरणी पुणे महानगर पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या उपायुक्तासह त्याच्या पत्नीवर कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उपायुक्तांच्या घराची मंगळवारी सकाळपासून झाडाझडती सुरू आहे. एसीबीच्या कारवाईमुळे महापालिका अधिकाNयांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

विजय भास्कर लांडे (वय ४९) आणि शुभेच्छा वियज लांडगे (वय ४३ ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 

विजय लांडे हे पुणे महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागात वर्ग एक पदावर कार्यरत आहे. काही दिवसांपुर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला शुभेच्छा लांडगे यांच्या नावे तब्बल १ कोटी २ लाख ६० हजार रुपयांची संपत्ती जमवल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार विभागाने तपासणी केली. त्यावेळी लांडगे यांनी उत्पन्नापेक्षा तब्बल ३१ टक्के अपसंपदा पत्नीच्या नावे जमा केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांनी पुणे शहरात चार आणि नाशिकमध्ये एक मालमत्ता खरेदी केली आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शीतल घोगरे तपास करत आहेत.