पुणे, ७ जुलै २०२२ : सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुणे शहरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होतोय. या पावसात जे धोकादायक वाडे आहेत, ते अचानक पडू नये, या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील तब्बल ४७८ वाड्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. तर
पच्या आधी शहरातील विविध भागातील जे अतिधोकादायक वाडे आहे, अशा
एकूण ३८ हून अधिक वाडे पाडण्यात आले आहेत. महापालिकेचे बांधकाम विकास विभागाने दिली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात शहरातील जवळपास ४७८ धोकादायक वाडे आणि इमारती आहेत. ज्यांना पुणे महापालिकेच्या वतीने शासनाच्या
नियमानुसार सी १, सी २ आणि सी ३ अशा तीन भागात नोटीस बजावण्यात आली आहे. सी १ मध्ये जे अतिधोकादायक २८ वाडे होते, ते
सर्वच्या सर्व वाडे हे पाडण्यात आले आहे. तर २ मध्ये ३१६ वाडे होते, त्यामधील जे ११ अतिधोकादायक वाडे होते ते देखील पाडण्यात सी ३ मधील १३४ वाड्यांपैकी
वाडे हे पाडण्यात आले आहे. पुणे
महापालिकेच्या वतीने यंदाच्या पावसाच्या आधी शहरातील एकूण ३८ अतिधोकादायक वाडे हे पाडण्यात आले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसामध्ये दरवर्षी शहरात काही जुन्या इमारतींच्या भिंती किंवा काही भाग कोसळण्याचे प्रकार घडतात. पावसाळ्यात धोकादायक
इमारती, वाडे पडून होणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी पालिकेची धोकादायक इमारती उतरवण्याची खास मोहीम राबविण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात सीमाभिंती आणि जुन्या इमारती कोसळून होणारी जीवितहानी टाळयासाठी सीमाभिंती आणि जुन्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. यावर्षी सुद्धा सर्वेक्षण
झाल्यावर या पावसाळ्यात शहरातील एकूण ४७८ वाड्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा