September 24, 2025

पीएमडीटीए मानांकन अनिकेत वाकणकर टेनिस अकादमी एनसीएल ब्रॉन्झ सिरिज 2023 स्पर्धेत 110 खेळाडूंचा सहभाग

पुणे, 24 नोव्हेंबर 2023: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन अनिकेत वाकणकर टेनिस अकादमी एनसीएल ब्रॉन्झ सिरिज 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील ही स्पर्धा 25 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीत अनिकेत वाकणकर टेनिस अकादमी एनसीएल पाषाण रोड या ठिकाणी होणार आहे.

स्पर्धेत एकूण 110 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेतील विजेत्या व उप विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी रेशम रणदिवे यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली असल्याचे स्पर्धा संचालक अनिकेत वाकणकर यांनी सांगितले.