पुणे, 13 ऑक्टोबर 2023: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन रोहित शिंदे टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरिज 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 14 ते 16ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेत एकूण 130 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील ही स्पर्धा रोहित शिंदे टेनिस अकादमी टेनिस कोर्ट, दुधाने लॉन्स, कर्वेनगर या ठिकाणी होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उप विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सरदार ठाकूर यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली असल्याचे स्पर्धा संचालक रोहित शिंदे यांनी सांगितले.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय