पोलिसांच्या भरोसा सेल’ने पुण्यातील कोरोना हॉस्पिटलना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहाणी केली, नीलम गोर्हेनी केले पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

पुणे 24 एप्रिल 2021 : कोविड केअर सेंटरमधील महिलांची सुरक्षा आणि महिलांसाठी आवश्यक सुविधा यांची पाहणी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस विभागाच्या वतीने पोलिसांच्या भरोसा पथकाने विवध सेंटरर्सना भेटी दिल्या. पुणे पोलिसांच्या या सक्रिय उपक्रमाबद्दल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोर्हे यांनी पुणे ग्रामीण पोलीसांचे कौतुक केले.

डॉ.गोर्हे यांनी नुकतेच ग्रामीण पोलिसांना कोविड महिला सुरक्षाविषयक तत्व व प्रणाली याबाबत मार्गदर्शन केले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस अधिक्षक श्री अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील दौंड उपविभाग अंतर्गत १३ कोविड केअर सेंटरना ग्रामीण पोलिसांच्या भरोसा सेल पथकाने भेटी दिल्या. या केंद्रातील महिला रुग्ण,महिला डॉक्टर्स,नर्सेस, विलीनीकरण कक्ष,सुरक्षा रक्षक,सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्धता,महिला सफाई कर्मचारी इत्यादी बाबींची राज्याच्या आरोग्य विभागाच्या २३ मार्च २०२१ च्या स्थायी आदेशानुसार तपासणी केली. तसेच महिला रुगगणांबरोबर सुरक्षेच्या अनुषंगाने चर्चा केली. तपासणी अंती आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचनाही दिल्या. या तपासणी पथकात पोलीस उपनिरीक्षक देशमुख , हवालदार गुंड ,विरकर यांचा समावेश होता.

पुणे पोलिसांच्या या सक्रिय उपक्रमाबद्दल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोर्हे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक श्री.अभिनव देशमुख व त्यांच्या टीममधील पोलिसांचे अभिनंदन केले असून, राज्यभरात याच पद्धतीने,स्थायी आदेशानुसार सर्व कोविड केअर सेंटरची तपासणी करावी, असे पोलीस विभागास आवाहन केले आहे.