पुणे, २९/०१/२०२५: महात्मा गांधींबद्दल अपमान जनक वक्तव्य केल्याप्रकरणी गायक अभिजित भट्टाचार्य विरुद्ध पुण्यातील डेक्कन पोलिसांकडे सामाजिक कार्यकर्ते मनीष देशपांडे यांनी ॲड.असीम सरोदे,ॲड.श्रीया आवले, ॲड. रमेश तारू, बाळकृष्ण निढाळकर यांच्या मदतीने तक्रार दाखल केली आहे.
गायक अभिजित भट्टाचार्य याने नुकतेच एक मूर्खपणाचे व महात्मा गांधींचा अपमान करणारे वक्तव्य केले की भारत देश आधीच अस्तित्वात होता त्यामुळे महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत. खरे तर स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी विशेष प्रयत्न करून भारतातील विविध राजांना व संस्थानांना एकत्र आणून भारत हा देश साकार झाला. दुसरी गोष्ट गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधन सर्वप्रथम सुभाषचंद्र बोस यांनी दिले तर ‘महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव रवींद्रनाथ टॅगोर यांनी केला. पण अभिजित भट्टाचार्य चुकीचे वक्तव्य करून कलुषित राजकारण करीत आहेत त्यामुळे मनीष देशपांडे व लॉ च्या विद्यार्थ्यांतर्फे आम्ही अभिजित भट्टाचार्य याला नोटीस पाठविली पण त्याने उत्तर दिले नाही. त्यामुळे काल डेक्कन पोलीस स्टेशन पुणे येथ फौजदारी तक्रार दाखल केली आहे असे ॲड. असीम सरोदे म्हणाले.
पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागू पण कुणीही यावे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान करावा हें खपवून घेतले जाणार नाही असे मनीष देशपांडे म्हणाले.
डेक्कन पोलीस स्टेशन ने तक्रारीची दखल घेतली नाही तर आधी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात येईल आणि त्यानंतर न्यायालयात जाण्याचा मार्ग उपलब्ध आहे असे ॲड. श्रीया आवले म्हणाल्या.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर