बेकायदेशीरपणे हुक्का पार्ट्यांचे आयोजन करणा-या बड्या हॉटेल्स आणि बारवर पोलिसांकडून कारवाई; तीन जणांविरुद्ध गुन्हा तर सुमारे 90 हजाराचा मुद्देमाल जप्त 

पुणे, १५ मे २०२२ : शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरातील हॉटेल्स,बार मध्ये पहाटेपर्यंत तरुणाईच्या सुरू असलेल्या हुक्का पार्ट्या व त्यामुळे उद्भवणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेत, गुन्हे शाखेच्या

सामाजिक सुरक्षा विभागामार्फत ताबडतोब कारवाई सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुमारे 90 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

करोना नंतर सुरु झालेल्या न्यू नॉर्मल लाईफस्टाईल मध्ये पुण्यातील तरुणाईमध्ये रात्री उशिरापर्यंत हॉटेलींग करणे तसेच हुक्का पार्टीचे प्रमाण अधिकतेने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर योग्य नियंत्रण आणण्याचे आदेश शहराचे पोलीस आयुक्त, अमिताभ ग॒प्ता यांनी सामाजिक सुरक्षा विभागास दिली आहे.

त्यानुसार रात्री उशिरापर्यंत व विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरु असलेल्या हॉटेल्स,बार यांना प्रथम वेळेत बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही आस्थापना विहीत वेळेत बंद होत नसल्याने त्यांचेविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे.

 

या विशेष अभियानांतर्गत शनिवारी (दि.१४) रात्री सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी पोलीस दलात हजर झालेले नऊ परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक व अंमली पदार्थ विरोधी सेलचा स्टाफ यांनी संयुक्तपणे शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्स,बारवर तसेच हुक्का पार्लरवर कारवाई केली.

मुंढवा पोलिस स्टेशन हद्दीतील ‘वॉटर बार’ येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील ‘द हाउज अफेअर’ आणि कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील ‘रुफटॉप व्हिलेज’, व ‘अजांत जॅक्स’ अशा विविध हॉटेल्स बार आस्थापनावर छापा टाकून, त्यांच्या विरूद्ध,महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३क्ष अन्वये कारवाई करण्यात आली आहे. यापैकी

‘द हाउज अफेअर’ या बारवर करण्यात आलेल्या कारवाईत ६ हुक्का पॉट्स,चिलीम व वेग-वेगळ्या फ्लेवरचे तंबाखूजन्य पदार्थ,३ मोबाईल,१ डिव्हिआर व इतर साहित्य असे एकूण ८९ ,६००/- रू किचा मुद्देमाल कायदेशीररीत्या जप्त करण्यात आला आहे. तसेच बारचे मॅनेजर सौरभ दत्तात्रय नवगण (वय-३५), प्रसन्न उत्तम पाठक( वय-२४), श्रवण भटन मंडल (वय-३४) या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून,त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे ग॒.र.क्र.२२०/२२,कलम ४ (अ) ,२१(अ)

सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सधारणा) अधिनियम-२०१८ चे अन्वये कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.

 

ही कारवाई पोलीस आयक्त अमिताभ ग॒प्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे , उपायक्त (गुन्हे) श्रीनिवास घाटगे पोलीस यांच्या मार्गदर्शनखाली, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेश प्राणिक, पोलीस उप-निरीक्षक श्रीधर खडके, नऊ परीविक्षाधिन पोलीस उप-

निरीक्षक, तसेच सामाजिक सुरक्षा विभाग व अंमली पदार्थ विरोधी पथक-२ यांनी संयुक्तपणे केली आहे.