पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षकाने पुण्यात उकळली खंडणी

पुणे, २५/०८/२०२१: हॉटेल मॅनेजरला कारवाईची भीती दाखवून तसेच पोलीस आयुक्तालयातून आलो असल्याचे सांगत पिंपरी चिंचवडमधील एका पोलीस उपनिरीक्षकाने हॉटेल चालकाकडून ७ हजारांची खंडणी उकळली आहे. ही घटना काल रात्री दहाच्या सुमारास मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक, मिलन कुरकुटे वय २८ यांच्या विरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल मॅनेजर मारुती कोंडीबा गोरे, (वय ३१) यांनी तक्रार दाखल केली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री दहाच्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक कुरकुटे मुंढवा येतील लोकल हॉटेल, वन लॉन्ज हॉटेल, हॉटेल कार्टिव्हल, हॉटेल मेट्रो ओबीसी रोड याठिकाणी गेला होता. गणवेशातील पोलीस उप-निरीक्षक मिलन कुरकूटे स्वताच्या चारचाकी वाहनातून तेथे जाऊन मोठमोठयाने आरडाओरड करून मी पोलीस कमिशनर ऑफिसमधुन आलो आहे असे सांगुन फिर्यादी गोरे यांच्या हॉटेलवर कारवाई करण्याची धमकी देवुन दोन हजार रुपये घेतले. हॉटेल वन लॉन्ज मध्ये जावुन मॅनेजर साहील पित्रे यांनाही कारवाईची धमकी देवनु दोन हजारांची खंडणी घेतली.

हॉटेल कॉर्निव्हलचे मॅनेजर किशोर छोटुमल थापा यांनाही धमकी देवुन त्यांचेकडुन तीन हजार घेतले. असे एकुण सात हजार खंडणी स्वरुपात बेकायदेशीर मागणी करुन घेतले. तसेच आरोपीने हॉटेल मेट्रो येथे जावुन त्यांना सुध्दा खंडणीकरीता धमकावले. त्यानुसारच त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे