December 10, 2025

धोरणात्मक निर्णय; सोसायटीच्या ”एनओसी”शिवाय दारू दुकानांना परवानगी नाही-आमदार शंकर जगताप

पिंपरी–चिंचवड, १०/१२/२०२५: काळेवाडी–रहाटणी परिसरातील दोन दारू दुकानांवर कठोर कारवाई करत त्यांचे परवाने नवीन जागा मिळेपर्यंत निलंबित केले आहेत. याच प्रश्नावरून आमदार शंकर जगताप यांनी विधिमंडळाचे लक्ष वेधल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी दारू दुकानांसाठी कडक नियमावली देखील सभागृहासमोर ठेवली आहे. यापुढे सोसायटीच्या एनओसी शिवाय दारू दुकानांना परवानगी मिळणार नाही. मुख्य म्हणजे निलंबित करण्यात आलेल्या दारू दुकानांना नवीन जागेत स्थलांतर करण्यासाठी सोसायटी किंवा ज्या जागेवर दुकान सुरू करायचे आहे त्याच जागेची शहानिशा करून संबंधित अधिकारी संस्थेकडून एनओसी घ्यावी लागणार आहे असे देखील स्पष्ट करण्यात आले आहेत.

दरम्यान रहिवासी भागामध्ये दारू दुकानांना परवानगी देणाऱ्या महापालिका व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘ त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देखील सभागृहात देण्यात आले आहेत.

आमदार शंकर जगताप म्हणाले चिंचवड मतदार संघात येणाऱ्या काळेवाडी रहाटणी परिसरातील सह्याद्री सरकारी गृहरचना संस्था ,अनंत पार्क काळेवाडी, शिवतीर्थ सहकारी गृह रचना या श्रीनगर रहाटणी या परिसरातील नागरिकांनी विक्रांत वाईन शॉप आणि बजाज देशी दारू दुकान या दोन दुकानात संदर्भात वारंवार तक्रार केली होती. सह्याद्री सरकारी गृहसंस्थेच्या रहिवासी इमारतीच्या बिल्डिंगमध्ये पूर्णत्वाचा दाखला नसताना व्यापारी गाळ्यामध्ये विक्रांत वाईन शॉप या दुकानाच्या माध्यमातून दारू विक्री होत होती. तसेच शिवतीर्थ सहकारी गृह संस्थेच्या गेटलगत बजाज देशी दारू दुकान चालवले जात होते . या दुकानाच्या माध्यमातून दारू विक्री सर्रास केली जायची. येथे दारू पिऊन धिंगाणा घातला जात होता. ज्यामुळे महिला भगिनींना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. येथे वारंवार आरडाओरडा भांडण होत असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त होते. मद्यपीमुळे अनेकदा अपघातांचाही घटना घडल्या होता. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. याबाबत सभागृहाला आज अवगत केले. यानंतर सभागृहामध्ये या मुद्द्याला गांभीर्याने घेत दारू दुकानांबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

—————–

अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला व एनओसी शिवाय नियमबाह्यरित्या दारूचे दुकान सुरू करण्यास परवानगी देणारे महापालिका अधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले.

…….

काळेवाडी–रहाटणी परिसरातील दोन दारू दुकानांवर कठोर कारवाई करत त्यांचे परवाने नवीन जागा मिळेपर्यंत निलंबित केले आहेत. हे दारू दुकान असलेल्या मारतीला पूर्णत्वाचा दाखला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देण्यात आलेला नव्हता. त्या दुकानावर कारवाई करून त्या दुकानांचे नवीन जागेत स्थलांतर होईपर्यंत या दोन्ही दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे असे निलंबित केलेले परवाने यापुढे नव्याने स्थलांतरित करीत असताना ज्या जागेमध्ये हे दुकान स्थलांतरित होणार आहे. त्या जागेची शहानिशा करावी लागणार आहे. दुकान सोसायटीच्या आवारात स्थलांतरित होत असेल तर संबंधित दुकान मालकाला सोसायटीची एनओसी घ्यावी लागणार आहे. एनओसी असल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत दारूचे दुकान त्या ठिकाणी सुरू करता येणार नाही. असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी दिले आहेत – शंकर जगताप, आमदार, भाजपा पिंपरी चिंचवड शहर