पाण्याचा निचरा झाल्यामुळे चार सोसायट्यांचा वीजपुरवठा; एका सो सुरुसायटीमध्ये अद्यापही पाणी

पुणे, दि. १९ ऑक्टोबर २०२२: रास्तापेठ विभाग अंतर्गत एनआयबीएम परिसरातील पाचपैकी चार सोसायट्यांचा वीजपुरवठा बेसमेंट व मीटर बॉक्सजवळील पावसाच्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर मंगळवारी (दि. १८) मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ववत करण्यात आला. साईदर्शन, अर्चना कॅसल, ब्रम्हा मॅजेस्टिक व मनीष प्लाझा अशी वीजपुरवठा सुरु झालेल्या सोसायट्यांची नावे आहेत. या सोसायट्यांमध्ये सुमारे १५५ वीजग्राहक आहेत.

दरम्यान बुधवारी (दि. १९) दुपारी तीन वाजेपर्यंत द लॅटीट्यूड या ९५ वीजग्राहकांच्या सोसायटीमधील पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. मीटर बॉक्स व संच अद्यापही पाण्यात असल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. पाण्याचा निचरा, चिखल व ब्लोअरने ओल काढल्यानंतर या सोसायटीचा वीजपुरवठा सुरु करण्यात येणार आहे.