ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिक शेओरान, ऋषिता बोक्का, ऋषिता बसिरेड्डी यांचा मानांकीत खेखाडूंवर विजयासह उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

औंरंगाबाद, दि 16 नोव्हेंबर 2022: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली  ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय  टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात उप-उपांत्य फेरीत मुलांच्या गटात हरयाणाच्या प्रतिक शेओरान याने तर मुलींच्या गटात तेलंगणाच्या ऋषिता बोक्का व ऋषिता बसिरेड्डी यांनी मानांकीत खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स औंरंगाबाद येथे  सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात  हरयाणाच्या प्रतिक शेओरान याने तेलंगणाच्या आठव्या मानांकीत हृतिक कटकमचा  6-3, 6-0 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. कर्नाटकच्या अव्वल मानांकीत आराध्या क्षितिजने महाराष्ट्राच्या आयुष पुजारीचा 6-2, 6-2 असा तर महाराष्ट्राच्या तिस-या मानांकीत शिवतेज शिरफुलेने अमोघ दामलेचा 6-3, 6-0 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

मुलींच्या गटात तेलंगणाच्या बिगर मानांकीत ऋषिता बोक्काने तमिळनाडूच्या चौथ्या मानांकीत दिया रमेशचा 6-2, 6-3 असा तर ऋषिता बसिरेड्डी हीने महाराष्ट्राच्या आठव्या मानांकीत सेजल भुतडाचा 6-1, 6-2 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या सातव्या मानांकीत नैनिका बेंद्रमने  देवांशी प्रभुदेसाईचा 6-1, 6-4 असा तर तमिळनाडूच्या अव्वल मानांकीत माया राजेश्वरन हीने आपल्या राज्य सहकारी सविता भुवनेश्वरनचा 6-1, 6-2 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल:(मुख्य ड्रॉ) उप-उपांत्यपुर्व फेरी: मुले: 

आराध्या क्षितिज (कर्नाटक) (1) वि.वि आयुष पुजारी (महाराष्ट्र) 6-2, 6-2

प्रकाश सरन( कर्नाटक ) (5)  वि.वि  शौर्य भारद्वाज ( उत्तर प्रदेश  ) 4-6, 6-3, 6-1

शिवतेज शिरफुले (महाराष्ट्र ) (3) वि.वि  अमोघ दामले ( महाराष्ट्र  )6-3, 6-0

प्रतिक शेओरान(हरयाणा)  वि.वि  हृतिक कटकम (तेलंगणा)(8)  6-3, 6-0

एम दिगंत(कर्नाटक)(6) वि.वि क्रिस्टो बाबू (कर्नाटक)  6-3, 6-2

शोर्या समाला (तेलंगणा)(4) वि.वि रणवीर सिंग(हरयाणा) 6-2, 6-1

शौर्य कल्लंबेला (कार्नाटक) वि.वि यश पटेल (गुजरात) 6-2, 4-6, 6-3

वेदांत भसीन (महाराष्ट्र) वि.वि विश्वजीत सणस (महाराष्ट्र) 6-1, 7-6(6)

 

उप-उपांत्यपुर्व फेरी: मुली: 

माया राजेश्वरन (1) (तमिळनाडू)  वि.वि   सविता भुवनेश्वरन (तमिळनाडू) 6-1, 6-2

आराध्या वर्मा (ओडिशा)(5)  वि.वि   शेरी शर्मा (हरयाणा) 7-6(3), 6-3

ऋषिता बोक्का(तेलंगणा)  वि.वि  दिया रमेश(तमिळनाडू) (4) 6-2, 6-3

ऋषिता बसिरेड्डी (तेलंगणा)  वि.वि   सेजल भुतडा (महाराष्ट्र) (8) 6-1, 6-2

नैनिका बेंद्रम ( महाराष्ट्र  ) (7)  वि.वि   देवांशी प्रभुदेसाई ( महाराष्ट्र  ) 6-1, 6-4

शैवी दलाल (गुजरात)(6)  वि.वि   स्वानिका रॉय( महाराष्ट्र  ) 6-0, 6-2

हरिताश्री व्यंकटेश (तमिळनाडू)(2)  वि.वि   स्निग्धा रुहिल(हरयाणा) 3-6, 6-3, 6-1