12व्या ओम दळवी मेमोरियल मातोश्री वरदविनायक एआयटीए 18 वर्षाखालील सुपर सिरीज टेनिस स्पर्धेत आर्यन सुतार, ऋषिकेश बारवे, अर्जुन कीर्तने यांची आगेकूच

पुणे, 5 नोव्हेंबर 2022:  ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित 12व्या ओम दळवी मेमोरियल मातोश्री वरदविनायक एआयटीए 18वर्षाखालील सुपर सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात ऋषिकेश बारवे, आर्यन सुतार, अर्जुन कीर्तने या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. 
 
महाराष्ट्र पोलीस टेनिस कोर्ट, औंध आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात  चुरशीच्या लढतीत ऋषिकेश बारवे याने स्वराज देशमुखचा 9-8(1) असा संघर्षपूर्ण पराभव केला. आर्यन सुतार याने श्री राऊतचा 9-2 असा तर, अर्जुन कीर्तने याने आदित्य रानवडेचा 9-6 असा पराभव करून आगेकूच केली.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी:
स्वर्णिम येवलेकर वि.वि.अर्चित डहाळे 9-6;
ओंकार शिंदे वि.वि.ओम लाडोळे 9-2;
विश्वजीत सणस वि.वि.देव तुरकिया  9-3;
अद्विक नाटेकर  वि.वि.आदित्य देवकर 9-0;
मीर वेरेकर वि.वि.पियुष जाधव 9-6;
ऋषिकेश बारवे वि.वि.स्वराज देशमुख 9-8(1);
आर्यन सुतार वि.वि.श्री राऊत 9-2;
अर्जुन कीर्तने वि.वि.आदित्य रानवडे 9-6.