नाना पेठ, २५ एप्रिल २०२५ः काश्मिरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात नाना भवानी पेठ अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला.
पाकिस्तान मुर्दाबाद आणि दहशतवाद मुर्दाबादची घोषणा करत हे निषेध आंदोलन नाना पेठ येथील ए डी कॅम्प चौकात पार पडले. यावेळी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मुस्लिम धर्मात निर्दोषांना मारणे म्हणजेच पाप करण्या सारखे आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यातून आज मानवतेला आघात झाला आहे. पहलगाम येथील हल्ला करणारे दहशतवाद्यांची नावे मुस्लिम धर्मातील असली तरी त्यांना आम्ही मुस्लिम मानत नाही. मुस्लिम धर्माला बदनाम करण्याचे तसेच या धर्माबाबत देशातील नागरिकांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचा कट या दहशतवाद्यांनी केली आहे. या देशात मुस्लिम बेयमान नाही, आणि तो मेहमान पण नाही. त्यामुळे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत आम्ही सरकारला मागणी करत आहोत की या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी. असे यावेळी संघटनेच्या वतीने सांग्यात आले.
More Stories
Pune: मेधा ताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही – रुपाली ठोंबरे पाटील
Pune: जैन बोर्डिंग जागा विक्रीव्यवहार प्रकरणाला जैसे थे ठेवण्याचे आदेश
Pune: पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ रंगणार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान