पुणे, दि. ११ मे २०२१: कोरोना प्रादुभार्वात शासनाच्या प्रतिबंधित आदेशाचे उल्लंघन करीत विनापरवानगी आंदोलन करणे आझाद समाज पार्टीला भोवले आहे. त्यांनी काल दुपारी बाराच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भोसलेनगर परिसरातील घरासमोर आंदोलन करीत पोलीस उपनिरीक्षकासोबत झटापट केली. याप्रकरणी पोलिसांनी पार्टीच्या १० जणांना अटक केली आहे.
भिमराव दत्तू कांबळे, अभिजीत मधुकर गायकवाड, रफिक रूस्तूम शेख, अंकित परशुराम गायकवाड, दर्शन बाबुराव उबाळे, दत्ता मोहन भालशंकर, विनोद लक्ष्मण वाघमारे, महेश वैजनाथ थोरात, सागर विरभद्र जवई, शरद गौतम लोखंडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय नोकरीतील एस.सी आणि एसटी प्रवर्गाचे आरक्षण शासनाने रद्द केल्याचा गैरसमज आझाद समाज पार्टीने केला होता. त्यानुसार कार्यकत्र्यांनी सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भोसलेनगर परिसरातील घरासमोर विनापरवागनी आंदोलन केले. कोरोना प्रादुभार्वात सुरू असतानाही संबंधिताने शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत घोषणाबाजी केली. त्याशिवाय शासन आदेश जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी ताब्यात घेताना त्यांनी फिर्यादी माळी यांच्यासोबत झटापट करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कोळी तपास करीत आहेत.
More Stories
जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर यांना राष्ट्रीय पुरस्कार
पुण्यात पोलीस ठाण्यातच महिलेने प्यायले फिनाईल, आयुक्तालयानंतर कोंढव्यात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे: शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन ठार, सहकारनगर,वाघोलीत अपघात