पुणे: अल्पवयीन कबड्डीपटू मुलीचे शीर धडावेगळे करून केला खून, खूनाला एकतर्फी वादाची किनार

पुणे, १२/१०/२०२१: कबड्डीपटू असलेल्या अल्पवयीन मुलीवर कोयत्याने वार करून तिचे शीर धडावेगळे करीत खून केला. ही धक्कादायक घटना बिबवेवाडीत एका लॉन्ससमोर मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. एकतर्फी प्रेमातून मुलीचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी दुचाकीवरून आलेल्या तिघा आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती बिबवेवाडी पोलिसांनी दिली आहे.

खून झालेली मुलगी कबड्डीपटू असून आठवीत शिक्षण घेत होती. आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ती मित्र-मैत्रिणीसोबत खासगी लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करीत होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी एका आरोपीने तिला बाजूला बोलावून घेतले. त्यावेळी मुलाच्या एकतर्फी प्रेमातून त्यांच्यात वादावादी झाली. त्याच रागातून आरोपीने सोबत आणलेल्या कोयत्याने मुलीवर सपासप वार केले. अत्यंत व्रुâरपद्धतीने तिच्यावर वार करून शीर धडावेगळे केले. त्यानंतर तिन्ही आरोपींनी घटनास्थळी कोयते टावूâन पळ काढला. आरोपीच्या शोधासाठी तपास पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .