पुणे: लोहगाव मध्ये १६ किलो अफुची बोंडे चुरा जप्त, दोघांना अटक

पुणे, २८/०९/२०२२- लोहगावमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना अमली पदार्थ पथक एक आणि खंडणी विरोधी पथक दोननेअटक केली. त्यांच्याकडून १ लाख ६२ हजारांवर १६ किलो अफूची बोंडे चुरा जप्त करण्यात आला.

सोमराज सोहनलाल बिष्णोई, वय ३२ रा.रेणुका निवास श्रीकृष्ण कॉलनी, वॉटरपार्क रोड, लोहगाव पुणे मुळ रा. जिल्हा जोधपुर राजस्थान आणि प्रेमाराम पुनाराम बिष्णोई वय ३२ अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

लोहगाव परिसरात दोघेजण अफूची विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पथकाला मिळाली. दोन्ही पथकांनी संयुक्त कारवाईत अफू तस्करांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे १ लाख ६२ हजारांवर अमली पदार्थ जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त, अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श बालाजी पांढरे, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलेश सुर्वे, अमोल पिलाणे, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, पांडुरंग पवार, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, संदेश काकडे, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.